*
मुंबई - राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या लक्षात घेता तसेच राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे ५ हजार सापडलेलं रुग्ण त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन कालावधी वाढला आहे. राज्यात कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता उद्धव ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा राज्याने केली आहे. यापूर्वी लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.
हे लॉकडाऊन वाढवण्याचा आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केला. या आदेशात असे म्हटले आहे की राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका कायम आहे. म्हणूनच, व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाय म्हणून हे पाऊल उचलले जात आहे. (साथीचा रोग) अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम -२ अन्वये लॉकडाऊन महाराष्ट्रात ३१ जुलै २०२० मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आला आहे.
COMMENTS