*शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री मा ना श्री आदित्यसाहेब ठाकरे यांस 30 व्या वाढदिवसानिमित्ताने 30 रुग्णवाहिका भेट*
*नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण*
*पहिल्या टप्प्यात 5 व्हेंटिलेटर रुग्णवाहिका आणि 7 साध्या रुग्णवाहिका लोकार्पण*
मुंबई ( प्रतिनिधी ) दि 14 जून
शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने मुंबई आणि ठाणे शहरांसाठी एकूण 30 रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यांपैकी 12 रुग्णवाहिकांचे आज शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते आणि पर्यावरण मंत्री ना.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
या रूग्णवाहिका ठाणे तसेच मुंबईतील कोविड-19 रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठीच्या सेवेत रुजू झाल्या असून यांतील 5 रूग्णवाहिका या #व्हेंटीलेटर, #ऑक्सिजन_सिलिंडर आणि #मॉनिटरींग_मोबाईल-युनिट आदी सुविधांनी सुसज्ज आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी 12 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून उर्वरित 18 रुग्णवाहिका पुढील आठवड्यात लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी दिली.
COMMENTS