सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धोंडीराम झाडे यांना सेवापूर्ती निरोप

आष्टी (प्रतिनिधी )आष्टी तालुक्यात पोलीस प्रशासनाला मधील एक कर्तव्यदक्ष नाव म्हणजे पोलीस हेडकॉन्स्टेबल धोंडीराम झाडे. अत्यंत मनमिळाऊ स्वभावान...


आष्टी (प्रतिनिधी )आष्टी तालुक्यात पोलीस प्रशासनाला मधील एक कर्तव्यदक्ष नाव म्हणजे पोलीस हेडकॉन्स्टेबल धोंडीराम झाडे. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने बिकट प्रश्नही सहजरीत्या योग्य रीतीने कायद्याचे सर्व नियम पाळून हाताळणारे पोलीस म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली. त्यांचा वयोनियतमानाने पोलीस सेवेत 36 वर्षे सेवा अखंडित पूर्ण झाली .आज दि.30 जुन रोजी त्यांना अमळनेर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करत असताना सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आयोजित करून शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी पोलीस निरीक्षक शिरसाठ , सपोनि श्‍यामसुंदर डोंगरे, डॉक्टर युवराज तरटे ,डॉक्टर बडे वैद्यकीय अधिकारी, माजी जिप अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, शिवाजी नागरगोजे आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती .


  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धोंडीराम माणीकराव झाडे मूळ गाव वाकी बाबळगाव तालुका केज जिल्हा बीड येथून शिक्षण घेऊन 1985 साली पोलीस सेवेत रुजू झाले त्यांनी संपुर्ण छत्तीस वर्ष अखंडित सेवा केली .त्यामध्ये माजलगाव बारा वर्ष ,धारूर एक वर्ष, बीड तीन वर्ष, नेकनूर सहा वर्ष, आष्टी सहा वर्ष, आंबोरा सहा वर्ष ,अमळनेर एक वर्ष याठिकाणी काम केले काम करत असताना कुठलेही प्रकारची सेवेमध्ये खंड पडला नाही. त्यांच्या कामाविषयी कसलीही तक्रार निर्माण झाली नाही त्यांच्या कामाचे स्वरूप पाहून त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक मोठा मित्रपरिवार निर्माण झाला .आज सेवानिवृत्ती समारंभानिमित्त उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांनी ,मित्र परिवारांनी त्यांच्या कार्याचा गुणगौरव करून त्यांचा सपत्नीक सौ शकुंतला झाडे यांचा सत्कार करून सेवानिवृत्ती चा निरोप देऊन पुढील आयुष्याच्या शुभेच्छाही दिल्या. शुभेच्छा देताना अनेकांना भरून आले पोलीस धोंडीराम झाडे यांना तीन मुली, एक मुलगा हे ही उच्चशिक्षित असून मुलगा एमबीए करत आहे. या निरोप समारंभाला पोलीस काकडे ,रवी आघाव, सचिन तांदळे, सचिन गरजे ,मुरूमकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .उपस्थितांचे आभार व्यक्त करताना झाडे यांना आपले अश्रू लपवता आले नाही .आपले सर्वांचेे प्रेम हेच माझ्या छत्तीस वर्ष अखंडित सेवा करण्याची प्रेरणा आहे .या बीड जिल्ह्यातील जनतेने सर्वसामान्य नागरिकांनी आमच्या पोलिस प्रशासनातील उच्च अधिकारी सर्व मित्र परिवार यांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले ,सहकार्य केले म्हणूनच मी पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून जनतेची सेवा करू शकलो असे सत्काराला उत्तर देताना विचार व्यक्त केले यापुढेही पोलीस प्रशासनाला ज्यावेळी माझी कधी गरज लागेल त्यावेळी निस्वार्थपणे मी सेवा देण्याचे काम सुरू ठेवणार असल्याचेही सपोनि धोंडीराम झाडे यांनी यावेळी सांगितले.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group