- ३१ दात्यांनी केले रक्तदान.
माजलगांव (प्रतिनिधी)
अहिल्याबाई होळकर यांची जयंती व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ६जुन शनिवार रोजी संभाजी ब्रिगेड माजलंगाव च्या वतीने यशवंत हॉस्पिटल माजलगांव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ३१दात्यांनी रक्तदान केले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. यशवंत राजेभोसले, डॉ. शिवाजीराव काकडे ,डॉ. कोल्हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितित मराठासेवा संघ चे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरे, मराठासेवा संघ प्रदेश संघटक पुरुषोत्तम जाधव, संभाजी ब्रिगेड माजलगांव तालुकाध्यक्ष विजय दराडे, छत्रभुज देशमुख, पांडुरंग देशमुख, दुर्गेश देशमुख, विलास कोळपे हे उपस्थित होते. महाराष्ट्र भर कोरोना च्या काळात रक्त साठा कमी पड़त असल्याने संभाजी ब्रिगेड ने संपूर्ण महाराष्ट्रात ३१ में अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ते ६ जून शिवराज्यभिषेक दिन हा पुर्ण सप्ताहात वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याच पद्धतीने समाजकार्य म्हणून संभाजी ब्रिगेड माजलगांव कडून रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे आयोजन करण्यात विजय दराडे ,लक्ष्मण काशिद,छत्रभुज देशमुख,बाबा रेपे, दिलीप धुमाळ आदींनी परिश्रम घेतले.
COMMENTS