*शिक्षण विभाग जि.प.नांदेडची सर्व संघनेच्या पदाधिकार्‍या समवेत वेबिनार (झूम) बैठक संपन्न...*

------------------------------------- *नांदेड:-शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करणे बाबत आज शिक्षण ...


-------------------------------------


*नांदेड:-शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करणे बाबत आज शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सर्व संघटना पदाधिकारी यांच्या दुरुस्त वेबिनार झूम ॲप द्वारे आयोजित बैठकीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य संघटक चंद्रकांत मेकाले आणि जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी सहभाग घेतला.* बैठकीच्या सुरुवातीस राज्य संघटक चंद्रकांत मेकाले यांनी दिनांक 17 जून रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या फेसबूक लाईव्ह बैठकीत दिलेल्या निर्देशांचा संदर्भ देत शाळा सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीला सर्व शाळा निर्जंतुकीकरण करून देण्याबाबत आदेशित करण्यात येईल असे म्हटले होते, परंतु याबाबत ग्रामीण स्तरावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. *मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत लवकरच सर्व ग्रामपंचायतींना शाळा निर्जंतुकीकरण करून देण्याचे आदेश देण्यात येतील असे मा.शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी बैठकीतील उपस्थितांना अवगत केले.* ज्या शाळेमध्ये लोकांना विलगीकरण(काँरंटाईन) करण्यासाठी ठेवण्यात आले होते त्या सर्व शाळा मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात असे स्पष्ट करण्यात आले. शाळेवर जात असताना सर्व शिक्षकांनी आपण कोरोणा रोग मुक्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल अशा प्रकारचा शासन आदेश असल्याचे शिक्षणाधिकारी महोदयांनी अवगत केल्यानंतर *जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची शिक्षण विभागाच्या वतीने किंवा प्रशासनाच्यावतीने कोवीडची चाचणी मोफत करून देण्याची मागणीही राज्य संघटक चंद्रकांत मेकाले व जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी केली.* बाहेरगावावरून ये-जा करणाऱ्या शिक्षकांनी मुख्यालयी राहणे शिक्षकांसाठी जिकरीचे ठरणार असल्याचे मेकाले यांनी निदर्शनास आणून दिले.याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ,ग्रामपंचायत स्थानिक पातळीवरील कोरोणा नियंत्रण समिती यांच्या समन्वयाने मुख्याध्यापकांनी अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत असेही मा.शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केले. शाळा टप्प्याटप्प्याने जरी सुरुवात होत असल्यास तरी शासन निर्णयाप्रमाणे सर्वांनीच नियमितपणे शाळेत उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही शिक्षणाधिकारी यांनी सर्व संघटना प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे आता शाळेत किती शिक्षक जावे कोण कोण जावे हा निर्माण झालेला संदिग्ध प्रश्न सुटला असून सर्व शिक्षकांनी शाळेत नियमित उपस्थित रहावे लागणार आहे.कोरोणा पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील परिस्थिती सारखी नसल्यामुळे शाळा सुरुवात करणेबाबत नियोजन करणे, शाळांचे संचालन करणे, शैक्षणिक कामास सुरुवात करणे हे सर्व नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसारचअसेल; *त्याबाबत फक्त लवचिकता रेड झोन च्या बाबतीत असू शकते असेही शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केले. *या काळात कर्तव्यावर जाणाऱ्या शिक्षकांना मोफत आरोग्य सेवा,विमा संरक्षण देण्याची मागणी ही संघटनेच्यावतीने करण्यात आली.* जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनीशासन निर्णयाप्रमाणे आपले मुख्याध्यापक व स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या समन्वयातून आपले शैक्षणिक कार्य चालू करावे असे आवहान प्रशासणाचे वतीने करण्यात आले.अशाप्रकारे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे आरोग्य व विद्यार्थी विकास व शैक्षणिक कार्याच्या दृष्टीने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने *राज्य संघटक चंद्रकांत मेकाले आणि जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी अत्यंत प्रभावी भूमिका मांडल्या बद्दल व त्यास शिक्षणाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळवल्या बद्दल जिल्ह्यातील *सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन....*


💐💐💐💐💐💐💐                 


          *शब्दांकन*


        *नरसिंग जाधव,*


     कार्यालयीन सचिव,


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जि.नांदेड


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel