माजलगाव शहरातील अतिक्रमणा बाबत सोमवारी सुनवणी  

माजलगाव शहरातील अतिक्रमणा बाबत सोमवारी सुनवणी   कोरोणा लाॕकडाऊन मुळे झाला होता विलंब जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने दिला होता निर्णय शासकीय ...

  • माजलगाव शहरातील अतिक्रमणा बाबत सोमवारी सुनवणी  

  • कोरोणा लाॕकडाऊन मुळे झाला होता विलंब

  • जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने दिला होता निर्णय

  • शासकीय सर्व्हे न.३८० अतिक्रमण प्रकरण  

  • अतिक्रमण धारकत माजली खळबळ

  • __________________________


 माजलगाव ( प्रतिनिधी ) शहरातील मोक्याच्या ठिकाणी शासकीय सर्व्हे न.३८० वर ५८ बड्या लोकांनी टोलेजंग इमारती बांधुन अतिक्रमण करुन शासनाची जमिनी हाडपल्याने या बाबत पञकार सुभाष नाकलगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत जिल्हाधिकारी बीड व तहसिलदार माजलगाव यांनी सदरील अतिक्रमण धारकास दोन आठवड्याच्या आत नोटिस बजावुन तीन आठवड्याच्या आत सुनवणी घेवुन अतिक्रमणा बाबत कारवाईचा निर्णय घेण्याचे आदेश न्यायमुर्ती मा.प्रसन्ना बी. वराळे व न्यायमुर्ती आर.जी.अवटच यांनी दिले होते. माञ कोराणाच्या महामारी अपत्ती मुळे विलंब झालेली सुनवणी सोमवारी घेण्यात येणार आसल्याची माहिती तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांनी दिली आहे.


    माजलगाव शहरातील बहुचर्चित शासकीय गायरान सर्व्हे न. ३८० हा शहाराच्या मध्य भागी मोक्याच्या ठिकाणी आसलेल्या जागेवर आजुबाजुच्या सर्व्हे न. च्या नावावर खरेदीखत करुन शासकीय गायराण जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले.असुन शासकीय जागा हाडपल्याने महसुल प्रशासनाने एकुण ५८ अतिक्रमण धारकाच्या नोंदी घेतल्याने ते अतिक्रमण हाटवुन सर्वजनिक वापरासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी येथील पञकार सुभाष नाकलगावकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे लावुन धरली असतांना प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्या पलिकडे काहीच कारवाई करित नसल्याने शेवटी व्यथित होवुन सुभाष नाकलगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्यात आली.या याचिके दरम्यान प्रशासनास न्यायालयाने दिलेल्या नोटीसास उत्तर म्हणुन सदरील ठिकाणी अतिक्रमण आहे.व ते अतिक्रमण आम्ही निष्कसित करणार आहोत.व भविष्यात ते कदापी नियमित करणार नाहीत.आसे न्यायालयास शपथ पञा अधारे सांगितले. 


  अतिक्रमण हाटवण्या बाबत ठरवलेल्या प्रोग्रामची आमल बजावणी करण्यात आली नसल्याचे न्यायालयाने नमुद करुन 


सदरील अतिक्रमण धारकास दि.२६ फेब्रुवारी पासुन दोन आठवड्याच्या आत अतिक्रमण धारकास नोटिसा बजावुन तीन आठवड्याच्या आत जिल्हाधिकारी व तहसिलदार यांनी सुनवणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या मुळे अतिक्रमण हाटवण्या बाबत च्या कारवाईला वेग आला होता. माञ देशातील कोरोणा महामारीमुळे लागु केलेल्या लाॕकडाऊन मुळे सदरील सुनवणी पुढे ढकण्यात आली होती. ती सुनवणी दि.१५ जुन सोमवारी होणार या मुळे अतिक्रमण धारकात खळबळ माजली आहे. 


 


__________________________


   मा.उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार तहसिल कार्यालयाच्या वतीने सर्व अतिक्रमण धारकास नोटीसा बजावण्यात आल्या आसुन सदरील नोटीसावर दि.१५/६/२०२० रोजी सुनवनी घेण्यात येणार आहे.


       - डाॕ.प्रतिभा गोरे -


तहसिलदार माजलगाव 


__________________________


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel