माजलगाव प्रतिनिधी
शहरातील प्रभाग 12 मधील आजाद नगर वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर बोगस नाली बांधण्यात आले असून त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हे होणारे बोगस बांधकाम बंद करण्यासाठी
त्वरित दर्जेदार बांधकाम करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय भीमसेनेच्या वतीने सय्यद सलीम बापू यांनी गुरुवार दिनांक 11 रोजी सकाळी उपोषणास सुरुवात केली आहे.
शहरातील सर्वात मोठा प्रभाग असणाऱ्या आजादनगर वस्तीत जाण्यासाठी येण्यासाठी एकमेव रस्ता असून तो चाळीस फुटाचा आहे.यावर पूल बांधला होता. परंतु बोगस पद्धतीचा बांधल्याने तो पडला. त्यामुळे या ठिकाणी जमा होणारे पाणी वस्तीत शिरत आहे.या नाल्याजवळ विद्युत डीपी असून या ठिकाणी या नाल्याच्या पाण्यामुळे अनेक अपघात घडले आहेत यात एका व्यक्तीसह अनेक जनावरांचा शॉट लागून मृत्यू झाला आहे. आशा धोकादायक ठिकाणी दर्जेदार काम होणे अपेक्षित असताना संबंधित गुत्तेदार थातूरमातूर काम करून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे होणारा सदरील गैरप्रकार थांबून या पुलावर दर्जेदार नाली बांधकाम पुन्हा करण्यात यावी या मागणीसाठी भिम सेनेच्या नेतृत्वाखाली सय्यद सलीम बापू यांनी नाली वर उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
COMMENTS