*किसानपुत्र आंदोलनाच्या लाईव्ह व्याख्यानमालेच्या समारोपात दिल्लीहून बोलणार ऍड.अनुज सक्सेना*


पुणे- 


 


लॉकडाऊनच्या काळात किसानपुत्र आंदोलनाने शेतकरीविरोधी कायदे या मध्यवर्ती विषयाला धरून व्याख्यानमाला चालविली. त्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील 29 किसानपुत्र वक्त्यांनी भाग घेतला. या व्याख्यानमालेचा समारोप सर्वोच्च न्यायालयातील तरुण वकील ऍड अनुज सक्सेना करणार आहेत.


 


मकरंद डोईजड यांनी शेतकरी स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची ते वकील आहेत. राम जेठमलानी यांच्याकडे त्यांनी उमेदवारी केली आहे. शेतकरी स्वातंत्र्य हा त्यांच्या बांधिलकीचा विषय असून ते घटनेचे अभ्यासक व स्वतंत्रतावादाचे पुरस्कर्ते आहेत.


29 दिवस चाललेल्या व्याख्यानमालेचे सूत्र संचालन नितीन राठोड यांनी केले.


 


या व्याख्यानमालेत अमर हबीब, मकरंद डोईजड, डॉ आशिष लोहे, प्रमोद चुंचूवार, मयूर बागुल, ऍड. महेश गजेंद्रगडकर, डॉ. शैलजा बरुरे, संदीप रोडे, ऍड. भुषण पाटील, डॉ संदीप कडवे, अनंत देशपांडे, संजय सोनवणी, राहूल रमा बरडे, ऍड. सुभाष खंडागळे, अमित सिंग, साद अमन, सुधीर बिंदू, ऍड दिनेश शर्मा, सतीश देशमुख, सागर वाघमारे, संगीता देशमुख, संतोष अरसोड, प्रदिप म्हैसने, अरूण यावलीकर, ऍड. महेश भोसले, चिदंबर चांदूरकर, नितीन राठोड आदींनी आपले विचार मांडले.


 


करोनाच्या काळात आपापल्या ठिकाणी असलेल्या या किसानपुत्रानी 11 में रोजी औरंगाबाद जवळ रेल्वे अपघातात बळी गेलेल्या किसानपुत्राना श्रद्धांजली अर्पण केली होती.


 


या लाईव्ह व्याख्यानमालेचा लाभ महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक किसानपुत्र व पुत्रीनी घेतला असे नितीन राठोड यांनी सांगितले.


टिप्पण्या