देवणी येथे कोरोनो योद्ध्यांचा सत्कार संपन्न.
देवनी प्रतिनिधी.
देवणी तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून कोरोनो प्रतिबंध लढ्यात अहोरात्र परिश्रम घेऊन तालुका कोरोनो मुक्त ठेवण्याची कामगिरी बजावणाऱ्या प्रशासनाचा आणि पत्रकारांचा यथोचित जाहीर सत्कार करण्यात आला .
आमदार संभाजीराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्या तर्फे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवनी चे तहसीलदार सुरेश घोळवे हे होते.
सत्कार मूर्ती म्हणून आरोग्य खात्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर पर्गे आणि देवणीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीळकंठ सगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत पोलीस निरीक्षक सी एस कामठे वाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी गीरी गटशिक्षणाधिकारी पारसेवार यांच्या सर्व सहकाऱ्यांसह नगरपंचायत वीज वितरण आशादीप कार्यकर्त्या आणि पत्रकार यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके प्रशांत पाटील पृथ्वीराज शिव शिवे सभापती चित्रकला ताई बिरादार नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे उपसभापती शंकरराव पाटील काशिनाथ अण्णा गरीबे बाबुराव इंगोले बसवराज पाटील मनोहर पटणे ओम धनुरे रमेश मसुरे अटल विश्वास धनुरे कुमार पाटील कल्याण धनुरे मयूर पटणे संतोष पाटील प्रशांत पाटील राहुल तपसा ळे सोमनाथ बोरुळे साईनाथ बिरादार सुधीर भोसले डॉक्टर कालिदास बिरादार पोलिस उप निरीक्षक रणजीत काथवटे सहाय्यक गटविकास अधिकारी अच्युत पाटील पोलिस जमादार विनायक कांबळे सर्फराज गोलंदाज महिला अध्यक्ष रंजना पोलकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती या कार्यक्रमास होती.
यासोबतच वृक्षारोपण रक्तदान शिबिर मास्क चे वाटप आधी कार्यक्रम घेण्यात आले.
COMMENTS