कोरोना विषाणू विरुद्ध सर्व घटकांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता

कोरोना विषाणू विरुद्ध सर्व घटकांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता - आ.बाळासाहेब आजबे ---------------------------------- आष्टी येथे राष्ट्रवा...

कोरोना विषाणू विरुद्ध सर्व घटकांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता


- आ.बाळासाहेब आजबे


----------------------------------


आष्टी येथे राष्ट्रवादी काॕग्रेसचेवतीने २१ काेराेना याेध्दा चा सत्कार


*********************


आष्टी (प्रतिनिधी)


कोरोना विषाणू महामारीने संपुर्ण विश्व हादरवून सोडले असले तरी 


कोरोनाने आपणाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. या महामारी विरुद्ध समाजातील सर्व घटकांनी आपसात सामंजस्य राखून राजकीय पक्षभेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आ. बाळासाहेब आजबे यांनी केले.


              राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कोरोना वॅरीयर्स सन्मान सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. साहेबराव दरेकर हे होते. यावेळी रा.काॕ.चे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,डिवायएसपी विजय लगारे,तहसिलदार वैभव महिंद्रकर ,डाॕ.शिवाजी राऊत,काकासाहेब शिंदे,सुनिल नाथ, किशोरनाना हंबर्डे ,दत्ता काकडे ,सुधीर जगताप ,संदीप आस्वर हे उपस्थित होते.


     कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी यांनी केले. 


यावेळी आ.आजबे पुढे बोलताना म्हणाले की,कोरोना हे संकट पहिल्यांदा आले असल्याने आणि त्यावर विरोधी लस उपलब्ध नसल्यामुळे जगभर भितीचे सावट निर्माण झाले मात्र भारत देशातील जनतेची शारीरिक प्रतिकार शक्ती आणि जबरदस्त मानसिकता असल्यामुळे लोकसंखेच्या मानाने आपल्याकडे रुग्णसंख्या कमी आहे. कधी नव्हे ते अनुभवलेल्या लॉकडाऊनमुळे दीन दलित,शेतमजूर,कष्टकरी, हातावरील मोलमजुरीवर अवलंबीत असलेल्या मजूरांची हाल झाले मात्र सर्व ठिकाणी समाजातील चांगल्या मानसिकतेत असलेल्या दानशुरांनी जमेल तसे तन मन आणि धनाने या जनतेची सेवा केली आहे. ज्यांना जमेल त्याप्रमाणे त्यांनी समाजाची सेवा केली आहे.या भीषण संकटात महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग,पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था यांचेबरोबर निष्काम सेवा कामी यांनी पदरमोड करून याकाळात अन्नधान्य वाटप असो किंवा अन्नदानाचे कार्य असो.यामध्ये झोकून देऊन जीवाची पर्वा न करता काम केलेआहे. त्या सर्व घटकांचा कोरोना वाॕरीयर्स म्हणून सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला असल्याचे सांगितले. या घटकांतील सर्वांनीच अनमोल असे योगदान दिले आहे.


सर्वजण सन्मानास पात्र आहेत मात्र आपण सर्वातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात एक दोघांचा सन्मान केला आहे असे सांगत पुढील आणखी बराच काळ आपणास कोरोनालाबरोबर घेऊन जगण्याचा प्रसंग येणार असल्याचे सांगितले.


लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सर्वांनी सूचना कराव्यात आपण सर्वांनी मिळून या महामारीवर मात करावयाची आहे असे शेवटी आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.


            यावेळी बोलताना माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले की, या कोरोना लॉकडाऊनमध्ये आपणाला मनःशांती लाभली असल्याचे सांगितले.या सन्मान सोहळ्यामध्ये तहसीलदार वैभव महिंद्रकर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे,तत्कालीन प्रभारी तहसीलदार श्रीमती नीलिमा थेऊरकर ,नायब तहसीलदार शारदा दळवी,नायब तहसिलदार प्रदीप पांडुळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे,सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोठुळे, डॉ.राहुल टेकाडे, डाॕ.गणेश पिसाळ ,डॉ.नितीन मोरे, सिस्टर वंदना भैसाडे,सिस्टर विद्या घुगे, प्रफुल्ल गोसावी, पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार अविनाश कदम,सामाजिक कार्यकर्ते सुनील रेडेकर, स.पो.नि. अरुण कांबळे, सिताराम टेकाडे, डॉ.पंडितराव खिलारे,शाहीनबाग डॉ. नदीम शेख, शिक्षक भैरवनाथ भोसले, पोलीस दक्ष संघटनेचे अशोकदेवा जोशी,ज्ञानेश्वर पोकळे,,मंडळ अधिकारी पांडुरंग तात्या माढेकर,लाईनमन शिवाजी गोरे यांना या कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले.


उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे,नायब तहसीलदार शारदा दळवी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोठुळे,पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,शाहीनबाग डॉ. नदीम शेख,मंडळ अधिकारी पांडुरंग तात्या माढेकर,राष्ट्रवादीचे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी राऊत आदींची समयोजित भाषणे झाली. या संपुर्ण कार्यक्रमाचे संचलन काकासाहेब शिंदे यांनी केले.यावेळी जगन्नाथ ढोबळे , ठकाराम दुधावडे ,बबन रांझणे ,नाजीम शेख,डाॕ.नदीम शेख,डाॕ.जालींदर वांढरे , भाऊसाहेब घुले,हारुन शेख आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सुनिल नाथ यांनी मानले. 


 


*********************


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group