*पुरुष जातीचे नवजात बालक सापडल्याने खळबळ* सोनपेठ/प्रतिनिधी सोनपेठ तालुक्यातील निळा येथे पुरुष जातीचे आठ दिवसापूर्वी जन्मलेले बालक सापडल्याने...
*पुरुष जातीचे नवजात बालक सापडल्याने खळबळ*
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील निळा येथे पुरुष जातीचे आठ दिवसापूर्वी जन्मलेले बालक सापडल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहीती अशी की,सोनपेठ तालुक्यात शेवटचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या निळा येथे आठ दिवसापूर्वी जन्मलेले बालक रस्त्याच्या कडेस असल्याची माहीती पोलीस पाटील विजय सोळंके यांनी सोनपेठ पोलिसांना दिली होती.त्यावरून सोनपेठ पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.डी.भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवराव मुंडे हे तपास करत आहेत.दरम्यान हे मूल कोणाचे?कोणी टाकले?आणि कशासाठी अशा असंख्य प्रश्नांना पेव फुटले असून पोलिसांसमोर तपासाचे नवे आवाहन राहणार आहे.
COMMENTS