माजलगाव (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वक्तव्य आ. गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं त्या केलेल्या वक्तव्याचा पडसाद महाराष्ट्रात उमटले आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आ. पडळकर यांच्या प्रतिमेला चपल मरो आंदोलन केले होते आणि आज दि. 30 जून रोजी सकाळी 10 वाजता धनगर समाजाच्या कार्येकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करून राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कल्याण गवते,विलास नेमाने,नारायण भले,अशोक डोने, ज्ञानेश्वर सरवदे,सुखदेव मुळे,किसन वगरे,संतोष देवकते, कल्याण कसपटे,मुक्तीराम आबुज, बाबा हांडे, मंजुळदास कुंडकर, शंकरराव चोरमले,गणेश सातपुते,तात्या पांचाळ या सह धनगर समाजाचे कार्येकर्ते उपस्थित होते.
COMMENTS