मिशन आयएएस फेसबुक लाईवमध्ये करिअरच्या नव्या दिशा* शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने

*मिशन आयएएस फेसबुक लाईवमध्ये करिअरच्या नव्या दिशा* शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने


तरुण पिढीला विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी मिशन आयएएसने फेसबुक लाईव्ह हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमांतर्गत शनिवारी १३ जून २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता *करिअरच्या नव्या दिशा* या विषयावर चर्चा होणार आहे. निवृत्त माहिती संचालक तथा "करिअरच्या नव्या दिशा" या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक,मिशन आयएएसचे राज्य समनव्यक देवेंद्र भुजबळ यावेळी आपल्यासमवेत संवाद साधतील. तरी आपल्या मुलांना करिअरची योग्य दिशा समजण्यासाठी या फेसबुक लाईव्ह संवादाचा आपण अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मिशन आयएएसचे प्रमुख डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले आहे. सौजन्य अरुण दीक्षित पत्रकार


टिप्पण्या