शिक्षणाधिकारी यांचे लेखी व तोंडी सूचना बाबत...शिक्षक परिषद, मुंबई यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शिक्षणाधिकारी यांचे लेखी व तोंडी सूचना बाबत..., मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश विकास क्षेत्रात कोरोनाची वाढती आकडेवारी आणि त्याबाबतीत आपले कालचे लॉक डाऊन वाढवण्यासंबांधित विधान बोलके आहे . १५ जूनपासून शाळा सुरू होऊ शकत नाहीत. शाळा सुरू होण्यासाठी निश्चितच सद्यस्थितीत ही योग्य वेळ नाही. सर्व कामे वर्क फ्रॉम होम करणे साठी शासनाच्या सूचना आहेत.असे असताना १५ जूनला शाळेत येण्यासाठी मुंबई आणि शेजारील महानगरपालिका, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांनी लेखी पत्र काढून कळवले आहे, तसेच मुख्याध्यापक यांना तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी नसल्याने इतर कामे घरून करता येऊ शकतात. दि. ५ जून २०२० चे वित्त विभागाने ज्या सूचना सरकारी कार्यालये आणि सरकारी महामंडळ यांना लागू केल्या त्या शाळांना लागू नाहीत. त्यांचा दाखला देऊन उपस्थिती सक्तीची केली आहे अन्यथा वेतनावर गदा येईल अशी सूचना केली आहे, ( शासनाने यापूर्वीच कुणाचेही वेतन लॉक डाऊनमध्ये कापू नये अशी सूचना केली आहे.) शालेय शिक्षण विभागाने याची दाखल घेणे आवश्यक आहे. मुंबईतील ७० टक्के शिक्षक शिक्षकेतर, मुंबई बाहेरून कामाच्या ठिकाणी येतात, तसेच मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातही बाहेरून कामाच्या ठिकाणी येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तरांची मोठी संख्या आहे. लोकल सेवा बंद असल्याने १५ जून पासून प्रवास करणे शक्य नाही. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, टिटवाळा, डोबिवली, पालघर, विरार, वसई, भाईंदर अशा दूरच्या ठिकाणी ७० टक्के शिक्षक व शिक्षकेतर राहतात. आपण सुरू केलेली बस व्यवस्था अपुरी असून बस व्यवस्थेत सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नाही हे आजचं वृत्तवाहिन्यांवर पाहिले. बससाठी सकाळी ५ वाजल्यापासून रांगेत, ३/४ तास लोक उभे राहतात हे पाहिलं आहे, अशा स्थितीत १ लाख शिक्षक शिक्षकेतर यांची भर १५ जून पासून पडू शकते, शिवाय १०० टक्के शिक्षकांची शाळेत गरज काय? विद्यार्थी नसतानाची कामे घरूनही करता येतील! परंतु पगार कापण्याची भीती लोकांना घालून शासकीय परिपत्रकांचा चुकीचा अर्थ लावून भीती पसरवली जात आहे. कोणतेही काम करण्यासाठी हरकत नाही पण शाळेत येण्यासाठी आवश्यक वाहतूक सुविधा नाही, जिल्हाबंदी असल्याने लोक गावी आहेत, काही शिक्षक उत्तरप्रदेश, बिहार व अन्य राज्यात आहेत ही वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत शाळा सुरू होत नाही आणि विद्यार्थी शाळेत येत नाहीत तोपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलवू नये, अशी मागणी होत आहे, खाजगी कार्यालयात आपण १० टक्के उपस्थिती केली आहे, सरकारी कार्यालयात ही उपस्थितीसाठी सूट दिली आहे. शिक्षण अधिकारी यांच्या आदेशाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात राहणाऱ्या शिक्षकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे यातील ६० टक्के शिक्षक हा महिला वर्ग आहे, ह्याnn शिक्षकांनी सतत संघटनेकडे संपर्क करून व्यथा मांडली आहे. मे महिन्यात धान्यवाटप कामास नियुक्त करण्यात आलेली मंबईमधील शिक्षिका आणि कुटुंबीय यांना कोरोनाची लागण झाली असून खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची आर्थिक जबाबदारी शासनाने घेऊन संबंधितांना दिलासा द्यावा. ही विनंती. कृपया जोपर्यंत शाळा सुरू होत नाही आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होत नाही तोपर्यंत शिक्षकांना शाळेत येण्यासाठी सक्ती करू नये या विषयी संबंधितांना त्वरित आदेश द्यावेत अशी विनंतीशिक्षक परिषद, मुंबई अध्यक्ष उल्हास वडदकर. व शिवनाथ दराडे कार्यवाह. शिक्षक परिषद, मुंबई यांनी केले आहे
COMMENTS