*धर्मवीर भारती यांना लायन्स क्लबची फेलोशिप*
(प्रतिनिधी) : ३२३४H2 डिव्हिजन लातूर अंतर्गत असलेल्या लायन्स क्लबच्या धर्मवीर भारती याना फिलोशिप प्रदान करण्यात आली आहे .
अंधनिवारण हा प्रमुख उद्देश असणाऱ्या 104 वर्षाचा सामाजिक इतिहास असलेली 210 देशामध्ये कार्यरत असणारी 15 लाखांच्या वर सभासद संख्या असलेली जागतिक पातळीवरील सामाजिक क्षेत्रात काम करणारी लायन्स क्लब ही संस्था असून या संस्थेची MJF (मेलवींन जोन्स फेलोशिप)ही पदवी धर्मवीर भारती यांना माजी प्रांतपाल डॉ गोपाळराव पाटील आणि डॉ मन्मथ भातम्बरे यांच्या शुभहस्ते नुकतीच प्रदान करण्यात आली आहे .
लायन्स क्लब इंटरनॅशनल ला सामाजिक दृष्टीकोन ठेवत भरीव आर्थिक मदत करणाऱ्या लायन्सला ही MJF पदवी प्रदान करण्यात येत असते.लायन्स क्लब इंटरनॅशनल हा निधी मोफत अंधत्व निवारण करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी, दिव्यांग, व मधुमेह जनजागृती,नैसर्गिक आपत्ती व विविध सामाजीक कामासाठी याचा वापर केला जातो या साठी योगदान दिल्यामुळे धर्मवीर भारती, गगन मालपाणी, अनिरुद्ध कुरुंडकर आदी लायन्स ला फिलोशिप बहाल करण्यात आली आहे .
या वेळी लायन्स क्लबचे लॉ मनोज देशमुख.लाँ राजेश मित्तल लाँ जगदीश हेड्डा.सुनील लोहिया धनंजय बेंबडे.अनिल पुरी.अजय गोजमगुंडे.नागनाथ गित्ते.शिवलिंग शेळके.दीपक शिवपूजे.माळवदकर.महादेव कनकुले.सुधाकर जोशी.उमेश पोपडे.आदी लायन्स क्लबच्या विविध विंग च्या लायन्स ची प्रमुख उपस्थिती होती
COMMENTS