पुणे
- पवारांवर जहरी टीका करणाऱ्या भाजप आमदार पडळकरांवर पाहिला गुन्हा दाखल
Jun 25, 2020 | भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वर बारामती येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पडळकर यांच्यावरती दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.पंढरपूर येथे शरद पवारांवर गंभीर आरोप करत टीका केली होती.
पुणे: भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार (mla, mlc) गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस (ncp)पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल (fir filed) करण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे शरद पवारांवर ) आरोप करत टीका केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दिली असून पडळकर यांच्यावरती दाखल झालेला हा पहिला गुन्हा असून महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील पडळकर यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS