- मैत्रिणीला भेटणे पडले महागात, पत्नीसह मुलांनी धो धो धुतले
24June 25, 2020
पुणे(global marathwada )
मैत्रिणीला भेटायला जाणे एका पतीला चांगलेच महागात पडले. पतीला रंगेहाथ पकडलेल्या पत्नीने आपल्या मुलांच्या मदतीने त्याला चांगलाच चोप दिला. याबाबत बांधकाम व्यवसायिक असलेल्या पतीने आपली पत्नी आणि दोन मुलांविरोधात फिर्याद दिली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात डांगे चौक येथे ही घटना घडली आहे.
संजय ससाणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात पत्नी पौर्णिमा, मुलगा दिपक देवांग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी संजय हे बांधकाम व्यावसायिक आहेत. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संजय हे त्यांच्या वाकड येथील एका मैत्रिणीला भेटायला गेले. त्यावेळी संजय यांची पत्नी आणि दोन्ही मुले संजय यांच्या नकळत त्यांच्या मागे आले. मैत्रिणीच्या घरातच संजय यांना पत्नी आणि दोन मुलांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर पौर्णिमा यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पौर्णिमा, त्यांची मुले आणि पती संजय यांच्यात समझोता घडवून आणला. त्यानंतर सर्वांना पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार, संजय पत्नी आणि दोन मुलांसोबत घरी आले. त्यानंतर रात्री आठ वाजता पत्नी पौर्णिमा आणि दोन्ही मुले संजय यांच्या बेडरुममध्ये आले. त्यांनी संजय यांच्याकडील मोबाईल फोन, गाडीची चावी काढून घेतली. त्यानंतर पोर्णिमाने संजय यांना पकडून ठेवले आणि मुलगा देवांग याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुसरा मुलगा दीपक याने कमरेच्या बेल्टने संजय यांना बेदम मारहाण केली. यामध्ये संजय यांच्या खांदा, तोंड, व डोक्यात गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी वाकड पोलीस तपास करत आहेत.
COMMENTS