नांदेड दि.23
येथील जि.प.हा.वाघी ता जि नांदेड या प्रशालेत आता इयत्ता नववी व दहावी वर्गाची ची शाळा शासन निर्णयानुसार एक जुलै रोजी सुरू होणार आहे असे वाटते शाळेत पूर्व तयारी सुरू असून रोटरी क्लब नांदेड यांच्या कडून बारा क्रॉम्पटन ग्रीव कंपनी चे सिलींग पंखे नुकतेच भेट देण्यात आहे जवळपास 22 मार्च पासून शाळा बंद आहेत.शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी या शाळा कधी सुरू होतील हे सध्या काही सांगता येणार नाही सध्या शासनाच्या आदेशानुसार इयत्ता नववी व दहावी चे वर्ग एक जुलै पासून सुरू होणार आहेत असे समजले . सध्या ऑनलाईन अभ्यास सुरू आहे .सदरील शाळेने शाळा सुरू होण्यापूर्वी ची तयारी सुरू केली आहे.पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची (पाठ्य पुस्तके) वाटण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब नांदेड कडून हे पंखे भेट देण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत वाघी ने सुद्धा शाळेत पिण्याचे पाणी, सॅनेनेटायझेशन, स्वच्छता गृहाचे काम जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .सदरील पंखे रो. गोपाल बंग,अध्यक्ष , रो.नितीन भारतीया,सचिव,रो.मनोज लोखंडे,सदस्य,रो.श्याम गंधेवार, सदस्य, रो.मुरली भुतडा,सदस्य यांच्या शुभहस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश ओंकार बादशहा, प्रलोभ माधवराव कुलकर्णी,डॉ .हेमंत कार्ले,शिवाजी माने यांच्या कडे एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्द केले. प्रलोभ कुलकर्णी यांनी पंखे शाळेला प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले. या वेळी बोलताना रोटरी क्लब नांदेडचे अध्यक्ष गोपाल बंग यांनी रोटरी क्लब नेहमीच सामाजिक कार्यात योगदान देेते असे सांगितले व रोटरी च्या कार्याची माहिती सांगितली. या वेळी डॉ. हेमंत कार्ले यांनी रोटरी क्लब नांदेड च्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.
COMMENTS