निरोप समारंभ
संत ज्ञानेश्वर विद्यालय लातूर फाटा मुखेडच्या मुख्याध्यापिका सीमा पुंजप्पा कठाळे हे दिनांक 1/7 /1992 रोजी गंगाबाई माध्यमिक विद्यालय सावरगाव (पिर) ता. मुखेड येथे मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाले 19 वर्ष 03 महिने 09 दिवस सेवा केल्यानंतर त्यांची बदली संत ज्ञानेश्वर विद्यालय लातूर फाटा मुखेड येथे दिनांक 10/10/2011 रोजी परत मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाले ते आज आज दिनांक 03 जून 2020 रोजी 28 वर्ष 03 महिने 29 दिवस या या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. अतिशय संयमी नेतृत्व व मराठी विषयाच्या गाढ्या अभ्यासिका म्हणून त्यांचे नाव लौकिक आहे सावरगाव येथे हे अतिशय कठीण प्रसंगात मुलींची शाळा असल्याकारणाने जबाबदारीने रात्रंदिवस मुख्याध्यापिका म्हणून काळजी घेतली कोणताही अनुचित प्रकार त्यांच्या काळात झाला नाही. गावातील लोकांशी समन्वय साधून कठीण प्रसंगातून मुलींची शाळा चांगल्या प्रकारे टिकून ठेवण्याच धाडस त्यांनी त्यांच्या या कालावधीत केला. पुढे त्यांची मुख्याध्यापिका म्हणून संत ज्ञानेश्वर विद्यालय लातूर फाटा मुखेड येथे दिनांक 10/10 2011 ला रुजू होऊन त्यांनी आपला पदभार स्वीकारला. याठिकाणीमॅडमनी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली. अतिशय मोलाचे शालेय उपक्रम व परिसंवाद या माध्यमातून त्यांनी चांगला ठसा उमटविला. अतिशय मनमिळावू स्वभाव हे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला संत ज्ञानेश्वर विद्यालयातील व प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी येथील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या पुढील आयुष्या स दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
COMMENTS