- खा.पदमश्री डॉ. विकास महात्मे यांचा उपक्रम
माजलगांव ( प्रतिनिधी )
पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या माध्यमातून माजलगाव शहर व ग्रामीण भागामधील काही डॉक्टरांना पी. पी. ई. किट्स वाटप करण्यात आले .
कोरोना साथीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या साथी रोखण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि या केंद्र आणि राज्य सरकारने खुप मोठे प्रयत्न केले आहेत. त्याच बरोबर या साथीशी शासनाच्या नियमानुसार गेल्या तीन महीन्या पासुन या साथीशी महसूल, पोलीस,सामाजिक संस्था, समाजसेवक, उद्योजक,यांनी ही मदतीच्या माध्यमातून खुप मोठ काम केलेले आहे आणि विशेषतः कोराना शी संपूर्ण जगात लढतोय तो म्हणजे आरोग्य खाते मधील डॉक्टर, नर्स,कंपाउंडर,मेडीकल, लँब हे लढत आहेत. या डॉक्टर योध्दा ना खा.पदमश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील डॉक्टराना पी.पी.ई.किट वाटप केले आहे. आणि त्याचाच भाग म्हणून माजलगांव शहरातील, व ग्रामीण भागातील काहीपी.पी.ई.किटचे वाटप दि.६ जुन रोजी डॉक्टरांना धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबुलाल ढोरमारे , बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तुकाराम येवले, संजय लकडे, गुलाब मोरे ,विजय तांदळे,मुन्ना सेठ जैन,बालाजी वगरज,यांच्या शुभ हस्ते डॉक्टरांना वाटप करण्यात आले.
COMMENTS