माजलगाव/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व डॉ आनंद लोढा यांच्या संयुक्त विद्यमाने माजलगाव मधील पत्रकार बांधवांना व वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना कोविड 19 चा मुकाबला करण्यासाठी अरसेनीक अलबम 30 या होमिओपॅथी औषधांचे मोफत वितरण करण्यात आले तसेच डॉ आनंद लोढा यांनी पोलीस प्रशासनास ही आर्सेनिक अलबम चे मोफत वितरण केले.
महाराष्ट्र्र राज्य मराठी पत्रकार संघ व डॉ आनंद लोढा यांनी कोविड 19 च्या विरोधात लढा देण्यासाठी पत्रकार,वृत्तपत्र वितरण करणारी मुले व पोलीस प्रशासना व त्यांचे कुटुंबीय यांना आर्सेनिक अलबम 30 या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वाटप केले.
डॉ आनंद लोढा यांच्या पावर हाऊस रोड वरील आयुष्य हॉस्पिटलमध्ये या औषदांचे वाटप करण्यात आले.यावेळीडॉ आनंद लोढा ,महाराष्ट्र्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष उमेशकुमार जेथलिया,जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम करवा,रत्नाकर कुलथे,प्रा सुदर्शन स्वामी,भास्कर गिरी,विजय मस्के आदी उपस्थित होते.
COMMENTS