*उन्नत शेतकऱ्यासाठी सर्वोदय केंद्र ठरत आहे केंद्रबिंदु*
*महिलांना दिल्या जात आहेत स्वालंबनाचे धडे*
सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
देशाच्या आणि राष्ट्राच्या जडणघडणीत महीलांचे योगदान महत्वाचे आहे.या योगदानातून राष्ट्र मजबूत होण्यास वाव मिळू लागल्याने महीला सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने विविध मार्गाने महीलांना स्वालंबनाचे धडे दिलेले आहेत.यातूनच सामजिक कार्यात काही महीला स्व:तला वाहुन घेत असल्याचे चित्र दिसून येत त्यामुळेच चुल आणि मूल या जोखडातून आता ग्रामीण भागातील महीला बाहेर येऊन आपल्या कारभाऱ्याला साथ देऊन कुटुंबाच्या यशासाठी झटतांना दिसत आहेत.यासाठी महीलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून प्रयत्न करुन जास्तीत जास्त महीलांना स्वालंबी बनवण्याचे प्रयत्न शासनकर्त्यांनी केले ते लयाला जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.महाराष्ट्र शासन अंगीकृत असणाऱ्या महीला आर्थिक विकास महामंडळ परभणी शाखेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्र सध्या सोनपेठ तालुक्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे दिसत असून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नत बनवण्यासाठी हे केंद्र सध्या केंद्रबिंदु ठरत आहे.याच केंद्राच्या माध्यमातून नसीमा सय्यद,विजयमाला ठेंगे ह्या त्यांच्या सहकार्यांना सोबत घेऊन वाटचाल करत आहेत.सध्या स्थितीत शेतकऱ्यात पेरणीचा हंगाम चालु असल्याने व निसर्गाने मागील वर्षी साथ दिली नसल्याने शेतकरी आर्थिक घडी बसवण्यात मग्न आहेत.यातच बाहेरील कृषी केंद्रचालक उसनवारी व्यवहार करण्यास धजावत नाहीत मात्र सर्वोदय कृषि सेवा केंद्र हे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवन्यासाठी कामी येत आहे.मागील चार वर्षापासून या कृषी केंद्राच्या माध्यमातून उत्पन्नावर हमी ठेवत संपुर्ण पैशातील निम्या नगदी दरात व निम्या उसनवार हमी उत्पन्न बोलीत बि,बियाणे,खते,औषधी उपलब्ध करून दिलेले आहेत.त्याचबरोबर ज्याच्या कुटुंबात दुर्धर आजाराने संकट ओढावले आहे असे,अपघटग्रस्त कुटुंब या कुटुंबाची आर्थिक घडी सुधरवण्यासाठी पूर्ण उत्पन्न हमी पध्दतीत उसनवार देऊन गौरवच केला आहे.सध्या कोरोना या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग व्यवसाय बंद व शेतकरी महीलांच्या कुटुंबाला उत्पादीत मालाला योग्य तो भाव न मिळाल्यामुळे अल्पभूधारक व गरजवंत शेतकरी महिलांना ह्या वर्षीही सर्वोदय सी.एम.आर.सी व महिला कार्यकारिणी संबधीत गावातील गावप्रतिनिधी ह्यांनी एका जबाबदारीचे पाऊल उचलून ह्याही वर्षी खते,बियाणे,बि खरेदी करण्यात आले आहे.यातून ९२महीला शेतकरी यांना खते,बियाणे,बि उपलब्ध करून दिले आहे.यातून ११३० एकर क्षेत्र लागवडीस मदत होणार असल्याचे समजते.
COMMENTS