- शुक्रवारी नांदेडमध्ये १७ करोना
एकूण करोना रुग्ण ३४८
२ – मृत्यू, एकूण मृत्यू १६
३ – व्यक्ती करोनामुक्त, एकूण करोनामुक्त २७०
नांदेड :- रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार १७ पॉझिटीव्ह मध्ये
१ पुरुष वय ६२ वर्ष रा. सुशील बुक जवळ, शिवाजी नगर नांदेड
१ महिला वय ५५ वर्ष रा. बोरबन एरिया, नांदेड
१ महिला वय ५८ वर्ष रा. गोकुळ नगर, नांदेड.
१ बालिका वय ०६ वर्ष रा. बिलाल नगर, नांदेड.
१ पुरुष वय ४४ वर्ष रा. टाकबीड, ता. नायगाव, जी. नांदेड.
१ महिला वय ४४ वर्ष रा. चंद्रभागा नगर, कंधार, जी. नांदेड.
१ महिला वय २२ वर्ष रा. नाथ नगर, नांदेड.
१ महिला वय ५२ वर्ष रा. भगत सिंग रोड, नांदेड.
१ महिला वय २० वर्ष रा. पिरबुऱ्हाण नगर, नांदेड.
१ महिला वय १९ वर्ष रा. पिरबुऱ्हाण नगर, नांदेड.
१ बालक वय ०३ वर्ष रा. पिरबुऱ्हाण नगर, नांदेड.
१ महिला वय ६० वर्ष रा. उमर कॉलनी, नांदेड.
१ महिला वय २८ वर्ष रा. उमर कॉलनी, नांदेड.
१ पुरुष वय ३४ वर्ष रा. लेबर कॉलनी, नांदेड.
१ महिला वय ६४ वर्ष रा. शिव नगर, देगलूर नाक्या जवळ, इतवारा, नांदेड.
१ महिला वय ५२ वर्ष रा. गॅस गोडाउन जवळ पालम रोड, लोहा, जी. नांदेड.
१ पुरुष वय ५५ वर्ष रा. गॅस गोडाउन जवळ पालम रोड, लोहा, जी. नांदेड.
कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील २ आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील १ असे एकूण ३ बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण २७० व्यक्ती कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
शुक्रवार २६ जून रोजी सायं ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण ७९ अहवालापैकी ७९ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे आज नवीन एकही बाधित व्यक्ती आढळला नाही. परंतु रात्री ११ वाजता प्राप्त झालेल्या अहवालामध्ये १७ व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत.
आज २ पॉझिटीव्ह बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उमर कॉलनी येथील ५४ वर्षाचा १ पुरुष व गुलजार बाग नांदेड येथील ६५ वर्षाचा १ पुरुषांचा यात समावेश आहे. हे दोन्ही बाधित डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार घेत होते. दोन्ही बाधितास उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. जिल्ह्यात आतापर्यत कोरोनामूळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. औषधोपचार चालू असलेल्या ६२ बाधितांपैकी ६ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय ५० व ५५ वर्षाच्या दोन स्त्री व ३८, ४२, ६७ व ७५ वर्षाचे चार बाधित पुरुषांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात ६२ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४४ तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे १ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ३ बाधित औरंगाबाद आणि १ बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. शुक्रवार २६ जून रोजी ६१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- १ लाख ४६ हजार ४४४,
घेतलेले स्वॅब- ६ हजार ४७,
निगेटिव्ह स्वॅब- ५ हजार २८०,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- १७,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ३४८,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- १६,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २७०,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ६२,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची ६१ एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
COMMENTS