*राज्य सरकारचा सामान्यांना दिलासा*
मुम्बई न्यूज
राज्य सरकारने कोरोना चाचणीच्या शुल्काविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कोरोनाचे निदान करणाऱ्या चाचणीचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे होते. आयसीएमआरने निश्चित केलेले 4 हजार 500 हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते.
या निर्देशानुसार ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, कोरोना चाचणीच्या दरात 50 टक्क्यांनी कपात खासगी लॅबला दणका दिला आहे. दुसरीकडे सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
*अहवाल* : आयसीएमआरनं सर्व राज्यांना कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारने हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने कोरोना चाचणीच्या सुधारित दरांविषयी अहवाल सरकारकडे सूपुर्द केल्यानंतर सरकारने दर निश्चित केले.
🗣️ *आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती* : “खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीच्या शुल्कात सरकारने कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी 4 हजार 500 रुपये इतके होते, ते आता 2 हजार 200 रुपये घेतले जाईल. कमी कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल,” असे टोपे यांनी सांगितले.
COMMENTS