*लातूर जिल्हाध्यक्षपदी शशिकांत उर्फ अमोल माने तर कार्याध्यक्ष पदी सुमित सातपुते यांची निवड.*
लातूर. प्रतिनिधी 13 जून 2020
डी.टी. एड.,बी.एड. स्टुडंट असोशियशन महाराष्ट्र राज्य गेल्या 8 ते 10 वर्षांपासून प्रलंबित शिक्षक भरती व्हावी यासाठी अविरत कार्य करत आहे तसेच राज्यातील गोर गरीब तरुणाला रोजगार मिळवून देण्यासाठी लढा देत आहे , हा लढा अजून प्रभावी करण्यासाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष मगर यांनी संघटनेचा राज्य विस्तार केला यात संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी संदीप कांबळे यांची निवड केली. तसेच लातूर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष म्हणून शशिकांत उर्फ अमोल माने तर लातूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सुमित सातपुते यांची निवड राज्य अध्यक्ष संतोष मगर यांनी केली , त्यांच्या या निवडी बद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच अभियोग्यताधारक मित्र मैत्रिणी आणि डी.टी. एड.बी.एड. धारक विद्यार्थी मित्रांनी अभिनंदन केले.
COMMENTS