धनेगाव ग्रामपंचायतीचा अजब फंडा
आधी एम बी...पैसे उचल... मग काम..!
देवणी ( खास प्रतिनिधी)
ग्रामपंचायत स्तरावर अगोदर विकासकामे पुर्ण करुन त्या कामाची मोजमाप पुस्तिका करुन नंतरच बिले अदा करण्याचे सक्त आदेश आहेत.पण धनेगाव ग्रामपंचायतीत सगळे नियम उलटे चालत असल्याचा प्रत्यय दिसुन येतोय.अगोदर हत्या कामाची एमबी करुन पैसे उचलायचे अन नंतर काम करायचे .या अजब फंडा राबवण्याचा सल्ला तालुकास्तरावरील लोकप्रतिनिधीने दिला आहे.शिवाय याला वरिष्ट नेत्याचे पाठबळ असल्याने संबधित अधिकारीही नाविलाजाने हा फार्म्युला राबवताना दिसतात.
ग्रामंपचायत पदाधिकारी यांचा कार्यकाल संपत आल्याने कामे होतील अथवा न होतील पण पैसे उचला...असा अलिखित आदेशच या पंचायतीने काढल्याने हा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेतुन समाजमंदीर बांधकाम ,पेवर ब्लाँक ,सिमेंट रस्ते ,तांडा सुधारवस्तीचे कामे ,वाँटर फिल्टर ही कामे सुरु आहेत.पण समाजमंदीर बांधकाम नियमबाह्य आहेत.जुने समारमंदीर पाडुन नवीन बांधकाम सुरु आहे.गेल्या चार महिन्यापासुन जुने समाजमंदीर पाडण्याचे संबधित विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही.शिवाय जुन्या समाजमंदीराच्या निघालेल्या मटेरियलचीही परस्पर विल्हेवाट लावली.वाँटर फिल्टरचा नमुना नंबर आठ प्रस्तावात नसताना टाँकीच्या जागेत बसवला जात आहे.ही सर्व कामे अद्याप सुरुच आहेत.गेल्या चार महिनूयापासुन वारंवार तक्रारी संबधित विभागाकडे करुनही प्रशासन चौकशी न करता उलट कामे पुर्ण होण्याअगोदर मोजमाप पुस्तिका तयार करुन शासनाचा निधी खिरापत वाटल्यागत ग्रामपंचायतच्या पदाधिकार्याना वाटत आहेत.
शांत बसा व्यवस्थित करतो....
याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्रीकांत पताळे यांच्याशी संबधित चौकशी संदर्भात विचारणा केली असता शांत बसा सर्व व्यवस्थित करतो.असे सांगितले
शिवाय ग्रामपंचायतीच्या तिघाडी गटाला कामाचे वाटप व देयके समप्रमाणात देवुन प्रशासन व लोकप्रतिनिधीकडुन कौतुकाची थाप घेत असले तरी नागरिकांच्या अडचणी दुर ठेवुन निकृष्टपणाचा कळस गाठला आहे.
सदर कामाबाबत १२ मार्च ,१५ मे व १.जुन मध्ये तक्रारी केल्यानंतर ३ जुन रोजी विस्तार अधिकारी अशोक कट्टेवार व कृषी अधिकारी बालाजी केदासे यांनी चौकशी केली.चौकशी पुर्ण होईपर्यत कामे बंद ठेवण्याचे सांगितले.तरीही कामे सुरुच असुन एम.बी करणै गातिमान झाले असुन या कामावर न आलेले शाखाअभियंता उदगीरातुन मोजमाप पुस्तिका लिहतात हे न उलगडणारे कोडे आहे.
सिईओनाही बनविले......
या कामाच्या तक्रारी शमविण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांना धनेगावात बोलावुन वृक्षलागवड करत आम्ही स्वच्छ असल्याचा निर्वाळा करण्याचा प्रयत्न केला.पण लावलेली रोपेच उपटुन दुसऱ्या गावात त्याच्याच हस्ते रोप लावणे हे किती पटाईत आहेत.काम न करता पैसे उचलणे तर सोडाच .अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. सिईओला बनविणे हेही ते पचेल का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
COMMENTS