कोरोनाचे एकुण ४१ रुग्ण उपचारांने बरे झाले;
जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ११६;
नांदेड एकूण मृत्यू – ६;
६७ रुग्णांवर औषधोपचार सुरु .
नांदेड :- 22 मे ग्लोबल मराठवाडा काल २१ मे २०२० रोजी जिल्ह्यात आनखी ६ नव्या करोना बाधितांची भर पडली असून आता करोना बाधितांचा एकूण संख्या ११६ झाली आहे. त्यापैकी २ रुग्ण गाडीपुरा या भागातील असुन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एका चा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे, ०१ रुग्ण यात्री निवास, नांदेड येथे दाखल आहे , ०२ रावण कुळा, तालुका मुखेड, येथील रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहेत व १ केरुर, तालुका बिलोली येथील रहिवासी असून तो बीलोली येथील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल आहे.
काल संध्याकाळी ५ रुग्ण बरे झाल्याची थोडी दिलासादायक बातमी आली होती त्यात डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील ३ रुग्ण, ग्रामीण रुग्णालय बारड येथील कोवीड केअर सेंटर मधील १ रुग्ण व यात्री निवास एनआरआय कोवीड सेंटर येथील १ रुग्ण असे एकुण ५ रुग्ण औषधोपचारामुळे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. ११० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४१ रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत ६२ रुग्णांवर औषधोपचार सुरु होते.P
जिल्ह्यात एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे १ लाख २६ हजार ७१६ व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण २ हजार ८२७ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी २ हजार ४६१ स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून बुधवार २१ मे रोजी पाठविण्यात आलेल्या ६६ रुग्णांचे अहवाल प्राप्त होतील व ६४ रुग्णांचे स्वॅब तपासणी चालू होती. त्यातील ६ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे घेतलेल्या एकुण स्वॅबपैकी ११६ रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत एकुण ११६ रुग्णांपैकी ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४१ रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचे ६७ रुग्णांपैकी ८ रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ५१ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये १ रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे २ रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे १ रुग्ण, बिलोली येथे १ रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
COMMENTS