लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या निधनाने
महाराष्ट्राचे सांस्कृतिक नुकसान
— सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची श्रद्धांजली
मुंबई (प्रतिनिधी)
लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या निधनाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, छगनरावांची गाणी ही महाराष्ट्रात विशेषत: ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय ठरली होती. महाराष्ट्रातील लोकगीतं, लोककला, लोकसंस्कृतीच्या प्रचार, प्रसारसाठी छगनरावांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र क़ायम लक्षात ठेवेल. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या माध्यमातून त्यांनी लोककलांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी घडवले. छगनराव चौगुले यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या लोककलेचे नुकसान झाले आहे.छगनराव चौगुले यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या लोककलेचे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
----------------------------------
COMMENTS