औरंगाबाद प्रतिनिधी
आज दुपारी 4 वाजता झूम अॅपच्या माध्यमातून सर्व शिक्षक आमदारांची बैठक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आयोजित केली होती. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता 15 जूनपासून शाळा सुरू करणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये अशी ठाम भूमिका शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी घेतली. जरी मे महिना संपत आला असला तरी जूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही लाखांत असेल असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यात कोरोना ग्रामीण भागात पोहोचला आहे. अनेक कामगार पालकांनी स्थलांतर केले आहे. अनेक शाळा, महाविद्यालये शासनाने क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतले आहेत. त्या कधी रिकाम्या होणार हे देखील माहिती नाही. त्यांचे निर्जंतुकीकरण कधी करणार तसेच राज्यातील सर्वच भागात लाॅकडाऊनच्या काळात शिक्षक कोरोना संबंधी ड्युटीवर आहेत. त्यांना दि. 1 मे पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी अजून मिळाली नाही. व त्यांना विमा संरक्षण कवचही नाही. ह्या सगळ्यांचा विचार करावा. पहिल्यांदा महसुल मंत्री यांच्याशी चर्चा करून शिक्षकांना कोरोनाच्या कामातून मुक्त करावे. अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली.
प्रथमतः 15 जूनला सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके घरपोच होतील असा आदेश काढावा. म्हणजे विद्यार्थी किमान घरी तरी अभ्यास करतील. सर्व्व शाळांनी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करावी. विद्यालये निर्जजंतुकीकरण करून प्रवेश सुरू करावेत. पहिल्या टप्प्यात 9 वी ते 12 वी चा वयोगट मोठा आहे. प्रथम हे वर्ग सुरू करावे. परंतु कोणत्याही परिस्थितीत 15 जूनला शाळा सुरू करु नयेत अशा सुचना त्यांनी मांडल्या.
COMMENTS