नांदेड, दि. 27 मे 2020: महावितरणकडून पावसाळापुर्व करावयाच्या देखभाल दुरूस्तीसाठी आज (दि.२८ मे) १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या नांदेड शहर व परीसरातील काही भागाचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी याची नोंद घेवून वीजपुरवठा बंद असलेल्या काळात सहकार्य करावे असे अवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
महावितरणने पावसाळयापुर्व देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे *गुरूवार दि.२८ मे २०२० रोजी* नांदेड शहराला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही विद्युत भवन वीजवाहिनीवरील रेस्ट हाऊस,स्टेडीयम, दत्त्नगर, नागार्जुना, एमजीएम परिसर तसेच ३३ केव्ही एनटीसी वीजवाहिनीवरील गुरूव्दारा, सोमेश कॉलनी, वजीराबाद, खडकपुरा परिसर, ३३ केव्ही पावडेवाडी वीजवाहिनीवरील यशवंत नगर, नसारदपुरा, ज्ञानेश्वरवाडी, फरांदेनगर, विजयनगर आदी परिसराचा वीजपुरवठा त्याचबरोबर ३३ केव्ही लींबगाव, ३३ केव्ही देगाव, नाळेश्वर व निळा या वीजवाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा *सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बंद राहील.*
COMMENTS