कामं झाले कमी ! म्हणून मिळेना रोजगाराची हमी ! 

तालुक्यात 91 ग्रामपंचायती ; 10 ग्रामपंचायतीतचं कामं ; 62 हजार जॉबकार्ड ; 137 मजूर कामावर..! ----------------------------------- घरकुल 5,शोष...

तालुक्यात 91 ग्रामपंचायती ; 10 ग्रामपंचायतीतचं कामं ; 62 हजार जॉबकार्ड ; 137 मजूर कामावर..!


-----------------------------------


घरकुल 5,शोषखड्डे 2,सार्वजनिक विहिरी 3,रेशीम 2 आणि रोपवाटिका 2 ही अत्यल्प काम सध्या सुरु असून कृृषी विभागातील बांधबंदिस्तीची काम तसेच जलसंधारणाची काम अद्याप तरी बंद आहेत.


-----------------------------------


माजलगाव : प्रतिनिधी 


कोरोनाच्या सावटाखाली दबलेला ग्रामीण भागातील मजूर हाताला कामं नसल्याने हताश झाल्याचे चित्रं सर्वत्र पहावयास मिळत आहे.ग्रामीण भागामध्ये पर-राज्यात ऊसतोडणीस गेलेले बरेच मजूर गावी आले असून काहींना क्वारंटाइन करण्यात आले तर अर्धे गावाबाहेर क्वारंटाइन केले आहेत.त्यांचा कालावधी संपला की ते देखील गावात दाखल होतील परंतु त्यांच्या हाताला कामं नसणार त्याचं काय ? अशा विवंचनेत त्या मजूरांची घालमेल सुरु झालीय. त्यात शेत मशागतीस ग्रामीण भागात यंत्राचा वापर होत असल्याने यंदा खरिपाची पेरणीपूर्व मशागतीचे काम ही अशी तशीच जाणार असल्याने शेत मशागतीतून मिळणाऱ्या रोजगारावर देखील संकट आले आहे.


 


   तालुक्यात ग्रामपंचायतीची कामांची मागणी सध्या कमी झाली असून गावागावांमध्ये कामं सुरु झाली की मजुरांची मागणी वाढणार परंतु चौथ्या टप्प्यात देशात लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात याची कडक अंमलबजावणी केली असल्या कारणाने मजुरांच्या हाताला काम नसल्याने रोजगार कमी झाला असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात 62 हजार 748 जॉबकार्ड धारक त्यापैकी 29,443 महिला मजूर असून यापैकी 9 हजार 163 अँक्टीव लेबर संख्या आहे.तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमांतून 137 मजुरांच्या हाताला काम मिळाले असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण यांनी बोलतांना दिली.


 


    माजलगाव तालुक्यातील 91 ग्रामपंचायती असून सध्या मनरेगाची कामं ही फक्त 10 ग्रामपंचायतीच्या माध्यमांतून सुरु असून इतर ग्रामपंचायतीने संबधित विभागाकडे कामासाठी मागणी केली तर मजुरांच्या हाताला कामं मिळतील व रोजगाराचे संधी उपलब्ध होतील.तालुक्यात ऊसतोड मजूर हजारोंच्या संख्येने परराज्यातून दाखल झाले असून अद्यापही तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने काम मिळण्यासाठी मागणी केली नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.आता तरी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेवून काम उपलब्ध करुन देत मजुरांची उपासमार होणार नाही याची वेळीच दक्षता घ्यावी.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group