कोरोनाच्या उपाय योजनेत राज्य सरकार अपयशी ठरले आहे - डॉ.प्रशांत पाटील

माजलगाव (प्रतिनिधी) माजलगाव येथे भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात कोरोन...


माजलगाव (प्रतिनिधी) माजलगाव येथे भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात कोरोनाच्या उपाययोजनेत राज्य सरकार अपयशी ठरले आहे यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात वेगवेगळे फलक दाखवून व घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. 


केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी विस लाख कोटींचे पॅकेज दिले असून जनतेसाठी अनेक प्रकारचे वेगवेगळ्या माध्येमातून केंद्र सरकार कामे करत आहे पण महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेसाठी अद्याप एक दमडीचेही पॅकेज दिलेले नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशालाही केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. तर देशात इत्तर राज्यातील सरकारांनी आपापल्या राज्यातील जनतेसाठी केंद्र शासनव्यतिरिक्त वेगळे पॅकेज दिले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी, असंघटित कामगार, बारा बलोतेदार व हातावर पोट असलेल्या जनतेसाठी पन्नास हजार कोटींचे पॅकेज द्यावे. पोलिसांवर व कोरोना योद्यांवर होत असलेले हल्ले तात्काळ बंद करावेत, माजलगाव नगर परिषेदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देऊन माजलगाव शहर स्वच्छ करून शहरातील प्रलंबित कामे पूर्ण करावी, शहरात कोरोना सोबत डेंग्यूचीही साथ पसरत आहे शासनाने शहरात ताबडतोब स्वच्छता मोहीम हाती घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, जिल्ह्यातील सर्व शासकीय कापूस खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करून शेतकाऱ्यांचा राहिलेला कापूस खरेदी करावा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.


यावेळी लॉक डाऊन च्या सर्व नियमांचे व सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी माजलगाव तालुका अध्यक्ष अरुण आबा राऊत शहर अध्यक्ष अँड सुरेश दळवे नगर परिषद पाणीपुरवठा सभापती विनायक रत्नपारखी, बीड जिल्हा सोशल मिडिया संयोजक दत्ता महाजन भाजपा माजलगाव तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सरवदे व अभाविप चे सोमेश दहिवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. माजलगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरा समोरील अंगणात सोशल डिस्टनसिंग चे पालन करत आपापल्या कुटुंबासोबत महाराष्ट्र बचाव आंदोलन करून महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त केला.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group