मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.
नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-
भारतीय जनता पक्ष - गोपीचंद कुंडलिक पडळकर, प्रवीण प्रभाकरराव दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, डॉ. अजित माधवराव गोपचडे, संदीप सुरेश लेले, रमेश काशिराम कराड.
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शशिकांत जयवंतराव शिंदे, अमोल रामकृष्ण मिटकरी, किरण जगन्नाथ पावसकर, श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे.
कॉंग्रेस - राजेश धोंडीराम राठोड .
नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेल्या उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-
अपक्ष - राठोड शेहबाज अलाउद्दीन
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. १४ मे २०२० आहे.
COMMENTS