उस्मानशाही मिल सुरू झाली पाहिजे,या मागणीसाठीगुरुवारी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.या निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे नांदेडची टेक्सटाईल मिल गेल्या २० वर्षांपासून बंद असल्यामुळे जिल्ह्याची अधोगती, शेतकरी आत्महत्या व बेरोजगारी वाढली आहे. ही मिल पुन्हा सुरू करण्यासाठी आर्थिक नियोजन व अनुदान द्यावे, अशी मागणी केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली. या आंदोलनात श्याम निलंगेकर,बळवंत मोरे,तरन्नुम मोहमद,शेख शकीला मॅडम,डॉ.किरण चिद्रावार,प्रांजली रावणगावकर,ललीता कुंभार,कावेरी ढगे,सुभाष लोखंडे, सत्यपाल सावंत (नगर सेवक) मुन्नाअली अब्बास( नगर सेबक ) ऍड.शिवराज कोळेकर,रोहन कहाळेकर,मंगला सोखरे,पुष्पा हटकर,गणपतराव पाचंगे,संजय राक्षसे,कॉ.प्रदीप नागपूरकर शिल्पा सुभाष लोखंडे,अब्दुल हफीज,नगमा सिद्दीकी,प्रा.डॉ.राम चव्हाण,पद्माकर सोनकांबळे,दिपक सातोरे कबीर रहमान,महंमद गनी,प्राचार्य बाबाराव नरवाडे,प्रा.प्रल्हाद इंगोले,प्रा.देविदास इंगळे यांच्या सह अनेकांनी सहभाग घेतला.
उस्मानशाही मील सुरु करण्यासाठी,व्यापलं आंदोलन कारण्याच्या दृष्टीने दिवाळी नंतर १५ नोव्हेबर पासून उस्मानशाही मील जागरण सप्ताह राबवून लोक प्रतिनिधी आमदार खासदार यांच्या घरी जागरण कार्यक्रम कारण्याचं समितीच्या वतीने श्याम निलंगेकर यांनी जाहीर केल.

COMMENTS