उदगीर/ प्रतिनिधी : तालुक्यातील लोणी येथील श्रेया कोचिंग क्लासेसचा १५ वा वर्धापन दिन शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा ...
उदगीर/ प्रतिनिधी : तालुक्यातील लोणी येथील श्रेया कोचिंग क्लासेसचा १५ वा वर्धापन दिन शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. गोविंदआण्णा केंद्रे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने उपस्थित होते. अशीर्वचन देण्यासाठी ह.भ. प. ब्रम्हनिष्ठ मठाधिपती भास्कर महाराज सांडोळकर हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वर बिरादार बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद लातूर, अहमदपूरचे नगराध्यक्ष स्वप्नील व्हत्ते, वैद्यकीय अधिकारी तथा मुख्य मंत्री सहायता निधी अधीक्षक परभणी डॉ. बालाजी ईप्पर, शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता खंकरे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहसेवा प्रमुख संतोष कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य संदीप बिरादार, महेश शिक्षण संस्थेचे सचिव प्रवीण बिरादार, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संपर्क प्रमुख विलास खिंडे, डॉ. विजय बिराजदार, प्रा. डॉ. अविनाश पाटील, प्रा. डॉ. सुनील ढगे, प्रा. गौरव जवळीकर, प्रा. दत्ताहरी होणराव, प्रा. तिरुपती केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. विठ्ठल लहाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व, जीवनातील ध्येय निश्चिती, आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
गेल्या १५ वर्षांपासून श्रेया कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे, इंग्रजी विषयाची आवड निर्माण करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे हा संस्थेचा उद्देश आहे. या प्रवासात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पांडुरंग बालाजी फड यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे आयोजन श्रेया कोचिंग क्लासेसचे माजी विद्यार्थी व क्लासेसचे संचालक प्रा. डॉ. पांडुरंग बालाजी फड यांनी केले होते. १५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा हा टप्पा संस्थेसाठी अभिमानास्पद ठरला असून भविष्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. अविनाश पाटील यांनी केले, सुरेख सूत्रसंचालन प्रज्ञा डिगोळे यांनी केले तर आभार तिरुपती केंद्रे यांनी मानले.

COMMENTS