गणेश कस्तुरे: मैत्रीविश्वातील अढळ तारा*

युवा पत्रकार व शिक्षक गणेश कस्तुरे यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. एक निर्भीड पत्रकार, उत्कृष्ट शिक्षक, जिवलग मित्र अशी ओळख त्यांनी...

युवा पत्रकार व शिक्षक गणेश कस्तुरे यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. एक निर्भीड पत्रकार, उत्कृष्ट शिक्षक, जिवलग मित्र अशी ओळख त्यांनी सर्वांच्या मनावर कायम कोरली आहे. क्राईम रिपोर्टमधील त्यांचा हातखंडा वाखाणण्यासारखा होता. विनोदी, मिश्किल स्वभाव, धाडसी व निर्भीड वक्तव्य अशा स्वभावाचे मिश्रण म्हणजे गणेश कस्तुरे होते.

त्यांचा परिचय मला करून दिला प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांनी. ओमप्रकाश गुंजकर, किरण शूरकांबळे आणि गणेश कस्तुरे म्हणजे ओकेजी (प्रत्येकाच्या नावाच्या इंग्रजी अद्याक्षरावरून हा ग्रुप तयार झाला होता) हे तीन मित्र बालपणापासून एकत्र शिकले, खेळले व संघर्ष केला.

गणेश कस्तुरे यांची कुटुंबातील परिस्थिती हालाखीची. प्रारंभी श्रीनगर येथे मेसवर गुजराण होत असे. नंतर काही काळ गणेश यांनी घरी जाऊन खाजगी शिकवणी देखील चालविली. या सर्व बालपण व तारुण्यातील परिस्थितीचे, संघर्षाचे साक्षीदार त्यांचे मित्र ओमप्रकाश गुंजकर. गणेश यांचे वडील हे धार्मिक, शांत, सुस्वभावी; मात्र मुलांच्या बाबतीत काहीसे कठोर व शिस्तप्रिय. कदाचित त्यामुळेच गणेश आयुष्यात स्थिरस्थावर झाले. या सर्व कौटुंबिक पार्श्वभूमीत गणेश शिक्षण पूर्ण करत गेले, घडत गेले व आयुष्याने शिकविलेला धडा मनावर कोरत गेले.

प्रत्येक प्रसंगात, घटनेत मिश्किल कोटी व विनोद यामुळे त्यांचा सहवास हवाहवासा वाटत असे. श्रीनगर येथे एकदा चहापानप्रसंगी मित्रांच्या गराड्यात गणेशच्या विनोदबुद्धीने तात्काळ प्रसंगावधान राखत विनोद केला. ते म्हणाले, बिल कोण देणार हे माहिती नाही; मात्र ऑर्डर मी देणार. प्रत्येक घटना व प्रसंगाला विनोदी वक्तव्याने ओलेचिंब करण्याचे कसब गणेश यांच्याकडे होते. गंभीर, उदास चेहऱ्याच्या या विश्वात हा अवलिया विनोद पेरत होता, इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमलवित होता व प्रत्येक क्षण-न् -क्षण जगत होता.

इतरांना मान-सन्मान व मोठेपणा देण्याची दुर्मिळ कलादेखील हा मित्र धारण करून होता. सकारात्मक दृष्टी हा त्यांचा स्थायीभाव. अशक्य व भीती हे शब्द शब्दकोशात नसलेला हा पत्रकार. एकदा मी इतरांना परिचय करून देत असताना मध्येच हस्तक्षेप करत गणेश मला म्हणाले, तुम्ही तुमची ओळख 'यशवंत कॉलेजचे गव्हाणे सर' अशी करून देत जा. बाकी इतर कोणताही परिचय अर्धवट व अपूर्ण आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला मानसन्मान व मोठेपणा देऊन त्याच्या मनात कायम घर करून राहण्याची कला गणेशला चांगली अवगत होती. माणूस पारखण्याची, हेरण्याची, ओळखण्याची नजर गणेश यांच्याकडे होती. ओमप्रकाश, किरण, गणेश हे ओकेजी या नावाने ओळखले जायचे. आज त्यातील जी म्हणजे गणेश कस्तुरे अनंतात विलीन झाले. अशा असंख्य मित्रांना पोरके करत गणेश निघून गेले. ५३ वर्षांचे आयुष्य हे काही जास्त मोठे नाही; मात्र अनुभव, शिक्षण व पदाचा समाजासाठी, इतरांसाठी सर्वार्थाने उपयोग करण्याच्या या काळात गणेश कस्तुरे यांची एक्झिट मनाला कायम रुखरुख लावणारी आहे.

जीवनाचे वास्तव उमजणारा, जगणारा गणेश भ्रमामध्ये, स्वप्नामध्ये व कल्पनांमध्ये वावरणारा नव्हता. जे आहे ते; जसे आहे तसे स्वीकारणारा वास्तववादी, परखड मित्र होता. एकदा सहज गप्पांच्या मैफिलीत गणेश म्हणाले, माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी एकदम फास्ट-फास्ट झालेल्या आहेत. शिक्षण फास्ट झाले, शिक्षक फास्ट झालो, पत्रकार फास्ट झालो आणि आता मृत्यू सुद्धा फास्ट येणार आहे. या वक्तव्याने सर्वांना अंतर्मुख केले. लगेच आम्ही म्हणालो, नाही; सर्व फास्ट ठीक आहे; मात्र मृत्यू फास्ट हे मनाला पटणारे नाही. तुमच्या हातून बरेच कार्य होणे अजून बाकी आहे.

मात्र नियती अंतिम आहे. काळाने गणेश कस्तुरे या मित्रावर घाला घातला व एका विनोदी, मिश्किल, निर्भीड, धाडसी मित्राला गमावले. ही दुःखद घटना आयुष्यभर सलत राहील.

गणेश कस्तुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

-डॉ.अजय गव्हाणे, नांदेड

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group