बिलोली प्रतिनिधी यंदा मृग नक्षत्रावर समाधानकारक पाऊस झाला असला तरी बिलोली तालुक्यातील अनेक गावांमधील तळे, बंधारे आता पासूनच कोरडे पडू लागले ...
बिलोली प्रतिनिधी
यंदा मृग नक्षत्रावर समाधानकारक पाऊस झाला असला तरी बिलोली तालुक्यातील अनेक गावांमधील तळे, बंधारे आता पासूनच कोरडे पडू लागले आहेत. विहिरींनीही आतापासूनच तळ गाठल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
*मृगात पाऊस, पण पाणी नाही?*
मृग नक्षत्रात पाऊस पडला, शेतकरी सुखावला. मात्र पावसाचे पाणी अडवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने पाणी वाहून गेले. परिणामी, ज्या तळ्यात मृगात पाणी साठायला हवे होते, ते तळेच आता कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
*विहिरी कोरड्या, शेतकरी हवालदिल
तालुक्यातील अनेक गावांमधील विहिरींना आतापासूनच पाणी कमी झाले आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावरच विहिरी कोरड्या पडल्यास वेगवेगळ्या प्रकारचे पिके पेरल्याने कशी जगवायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून, महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष?
तळे खोलीकरण, गाळ काढणे, बंधारे दुरुस्ती याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर चर्चा होते, पण कृती शून्य असल्याने यंदा उन्हाळ्यापूर्वीच टंचाई जाणवू लागली आहे.
नागरिकांची मागणी
तळ्यातील गाळ तात्काळ काढावा, विहिरी पुनर्भरण करावे आणि पाणी अडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे. अन्यथा यंदाचा उन्हाळा तालुक्यासाठी अत्यंत कठीण जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS