नरेंद्र येरावार उमरी नांदेड संसारी जीवनात आई-वडिलांची प्राप्ती करून घ्यावी, तर आध्यात्मिक जीवनात गुरूला प्राप्त करून घ्यावे, तरच जीवनात खऱ...
संसारी जीवनात आई-वडिलांची प्राप्ती करून घ्यावी, तर आध्यात्मिक जीवनात गुरूला प्राप्त करून घ्यावे, तरच जीवनात खऱ्या अर्थाने सुख मिळेल असे मार्मिक प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी केले.
उमरी शहरातील श्री गणेशनगर भागात चंदनवार परिवाराच्या वतीने आयोजित श्री शिव महापुराण कथेतून समाज प्रबोधन करताना ते बोलत होते. कथा ऐकण्यासाठी उमरीसह परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती शिवाय कथेला अनेक संत महंत मान्यवरांची उपस्थिती लाभत आहे.
आई-वडील हेच पहिले देव.....
महाराज म्हणाले, आजचा माणूस सुखाच्या शोधात बाहेर फिरतोय, पण खरे सुख घरातच आहे. ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, त्यांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद असेल तर कोणत्याही संकटात माणूस खचत नाही. घरात आई-वडिलांना दुखवून मंदिरात जाऊन देवाला प्रसन्न करता येणार नाही. आधी घरातील देवाला प्रसन्न करा, मग मंदिरातील देव आपोआप प्रसन्न होईल.
गुरूशिवाय ज्ञान नाही....
आध्यात्मिक जीवनात गुरूचे स्थान सर्वोच्च आहे. गुरू म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ. पुस्तकातून ज्ञान मिळेल, पण अनुभवातून मिळणारे ज्ञान फक्त गुरूच देऊ शकतात. गुरूवर निष्ठा ठेवली तर जीवनातील प्रत्येक अडचण सुटते. गुरूंची प्राप्ती झाली की, जीवनाला खरी दिशा मिळते, असे महाराजांनी सांगितले.
शिव महापुराणातून जीवनाचे सार.....
श्री शिव महापुराण ही केवळ कथा नाही, तर जीवन जगण्याची कला आहे. भगवान महादेव हे त्याग, वैराग्य, प्रेम आणि क्षमेचे प्रतीक आहेत. त्यांच्या चरित्रातून आपण कुटुंबासाठी त्याग कसा करावा, समाजासाठी कसे जगावे हे शिकले पाहिजे, असे प्रबोधन महाराजांनी केले.
कथेदरम्यान महाराजांनी भजन, अभंग आणि दाखल्यांच्या माध्यमातून उपस्थितांना खिळवून ठेवले. हर हर महादेव च्या गजराने संपूर्ण गणेशनगर परिसर दुमदुमून गेला होता.
चंदनवार परिवाराचे कौतुक....
अशा भव्य कथेचे आयोजन केल्याबद्दल महाराजांनी चंदनवार परिवाराचे विशेष कौतुक केले. एका कुटुंबाच्या संकल्पातून संपूर्ण गावाला कथामृत मिळते, हे खरे पुण्याचे काम आहे, असे ते म्हणाले.
यावेळी दिलीप चंदनवार, नगरसेवक संदीप चंदनवार परिवारासह गणेशनगरमधील सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता...

COMMENTS