*मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, आमदार खासदार जागे व्हा धोंड प्रकल्पाकडे लक्ष द्या धोंड प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू करा श्रेय कुणीही घ्या- भीमाशंकर मामा कापसे*

लोहा प्रतिनिधी लोहा तालुक्यातील बहुचर्चित धोंड प्रकल्पाचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद पडले असुन याकडे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, आमदार,...
लोहा प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील बहुचर्चित धोंड प्रकल्पाचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद पडले असुन याकडे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, आमदार, खासदार यांनी जागे होऊन तात्काळ लक्ष देऊन धोंड प्रकल्पाचे काम सुरु करावे श्रेय कुणीही घ्यावे असे प्रतिपादन आझाद ग्रुपचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते भीमाशंकर मामा कापसे यांनी थेट धोंड प्रकल्पाच्या प्रत्यक्ष साईडवर जाऊन केले.
दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी आझाद ग्रुपचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते भीमाशंकर मामा कापसे यांनी लोहा तालुक्यातील लव्हराळ येथे असलेल्या व गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेल्या धोंड प्रकल्पाची पाहणी पाहणी लव्हराळ, रिसनगाव,आष्टुर येथील शेतकरी, आष्टुरचे सरपंच बाबासाहेब बाबर, आझाद ग्रुपचे प्रदेश संघटक प्रसाद पोले,आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष माणिक पवार, यांच्यासहित पत्रकार बांधवांना प्रत्यक्ष साईडवर बोलाऊन पाहणी केली.
यावेळी पुढे बोलताना भीमाशंकर मामा कापसे म्हणाले की,
लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लिंबोटी धरणाप्रमाणे कामधेनू ठरणाऱ्या धोंड प्रकल्पाचे काम २०२१ ला मोठा गाजावाजा करून सुरू झाले होते. धोंड प्रकल्पाचे ३० टक्के सांडव्याचे काम करुन सदरील काम गेल्या दोन वर्षांपासून बंद पडले आहे. गुतेदारांने मशिनरी नेऊन काम गुंडाळून टाकले त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले . येथील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या जमिनी धोंड प्रकल्पासाठी भूसंपादीत केल्या.धोंड प्रकल्प लोहा तालुक्यातील या भागाला संजिवनी देणारा आहे. या प्रकल्पाची स्थापना माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी केली. कै.शंकरराव चव्हाण यांच्या काळात लिंबोटी धरण व धोंड प्रकल्प मंजूर झाले दुर्दैव असे की, लिंबोटी धरण हे माळाकोळी सर्कल मध्ये आहे पण माळाकोळी सर्कल मधील लोकांना पाणी मिळत नाही.
माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केले.
माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी या धोंड प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन केले. आज दिपावली आहे मी कुणावरही टिका करणार नाही
. हा भाग लातुर लोकसभा मतदारसंघात येतो. याकडे या भागाचे आमचे काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी कालगे, नांदेड चे खा.रविन्द्र चव्हाण यांनी ही लक्ष द्यावे.
हा प्रकल्प शेतकऱ्यासाठी संजिवनी ठरेल.जर पुढील चार महिन्यांत धोंड प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही तर या भागातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीमाशंकर मामा कापसे यांनी दिला आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group