ताणमुक्त जीवन जगण्यासाठी परिस्थितीचा स्वीकार आणि सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुरारी पावडे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणितीयशास्त्रे संकुल आणि तेजज्ञान फाउंडेशन, नांदेड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लाइफ बियॉन्ड स्ट्रेस’ या कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्षस्थानी संकुलाच्या संचालिका डॉ. आर. एस. जैन होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. जे. एन. कुलकर्णी, शैलेश हळदेकर आणि भरत कुलकर्णी यांचा समावेश होता.
कार्यशाळेत वर्तमान क्षणात जगणे, मनाशी सकारात्मक संवाद साधणे आणि तणावाचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व डॉ. जैन यांनी अधोरेखित केले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. नितीन दारकुंडे होते

COMMENTS