नवी मुंबई महानगरपालिका महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धा २०२६-२७ मध्ये सामाजिक बांधिलकी जपत, समाजप्रबोधनाचा संदेश देणारा सुंदर व प्रेरणादायी देखावा सादर केल्याबद्दल सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने " उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्काराने " सन्मानित करण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात नवी मुंबईचे लोकनेते आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते मंडळाला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि २२,०००/- रुपये रोख पारितोषिक, प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यसम्राट आमदार मा. मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईच्या महापौर मा. सुजाता पाटील, क्रीडा व सांस्कृतिक सभापती श्री. गिरीश म्हात्रे तसेच उपायुक्त श्रीमती अभिलाषा म्हात्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना मंडळाचे अध्यक्ष अजय पवार, कार्याध्यक्ष भाऊसाहेब आहेर, सचिव अभिजीत आंबुलकर खजिनदार ॲड. अमोल कुरळे
उपखजिनदार ॲड स्वप्निल गव्हाणे, उपसचिव राहुल कोयंडे तसेच पदाधिकारी सर्वंश्री. निलेश पाटील, महेश, सुधीर पवार उपस्थित होते.
हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नसून, सानपाड्याच्या राजावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक गणेशभक्ताच्या मेहनतीचा, एकजुटीचा, सेवाभावाचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव आहे! या यशासाठी अहोरात्र मेहनत घेणारे मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार, देणगीदार, हितचिंतक आणि तमाम सानपाडावासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
असे मारुती विश्वासराव कळविणे आहेत.

COMMENTS