पुणे दि.ज्येष्ठ - श्रेष्ठ साहित्यिकांच्या उत्कृष्ट बालसाहित्याने नटलेला 'बालकुमार' दिवाळी अंक म्हणजे मराठी बालवाचकांसाठी पर्वणीच आहे...
पुणे दि.ज्येष्ठ - श्रेष्ठ साहित्यिकांच्या उत्कृष्ट बालसाहित्याने नटलेला 'बालकुमार' दिवाळी अंक म्हणजे मराठी बालवाचकांसाठी पर्वणीच आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी केले. पुणे येथील अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेने सिद्ध केलेल्या 'बालकुमार' ह्या सहाव्या दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी हे होते. यावेळी विचारपीठावर अ. भा. म. बा. कु. साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात डॉ. सावंत पुढे म्हणाले, की बालसाहित्य हा एकूण साहित्याचा केंद्रबिंदू आहे. बालसाहित्याचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले, की आजच्या गोंधळलेल्या सामाजिक परिस्थितीत बालसाहित्याचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले आहे. बालसाहित्याला वाहिलेली मासिके बंद पडत असलेल्या कालखंडात 'बालकुमार'ची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. ही जबाबदारी ओळखून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संपादक मंडळाने परिपूर्ण दिवाळी अंक दिल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. वाचनसंस्कृती वाढली, तरच लेखनसंस्कृतीला बळ मिळणार आहे. त्यामुळे वाचनसंस्कृती विकसित करण्याच्या गरजेवर डॉ. सुरेश सावंत यांनी भर दिला.
दीपप्रज्वलनाने आणि सानेगुरूजींच्या 'खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे' ह्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात अ. भा. म. बा. कु. संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. पुढच्या महिन्यात बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. संस्थेचे कार्यवाह डॉ. दिलीप गरूड यांनी मागील सहा वर्षांतील 'बालकुमार' दिवाळी अंकाच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांनी साहित्य संस्थांचे संचालन अवघड होत असलेल्या काळात दरवर्षी साहित्य संमेलन घेणे, विविध स्पर्धांचे आयोजन आणि दिवाळी अंकाचे नियमित प्रकाशन याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल जैन यांनी केले. विनोद वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. अक्षरवेल इमारतीतील 'अक्षरवेल' सभागृहात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला सौ. सीमा चव्हाण, बी. आर. माडगूळकर, विनोद वाघ, कविता मेहेंदळे, मीरा शिंदे, विजय जगताप, रश्मी गुजराथी, आश्लेषा महाजन, डॉ. लता पाडेकर, बाळकृष्ण बाचल, सुरेश शेठ, माधव धायगुडे, रूपाली अवचरे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS