वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी एकजुटीने प्रयत्न करु-आ.राजूरकर

  .वृत्तपत्र विक्रेत्यांचा जिल्हा मेळावा उत्साहात. कुळकर्णी, कोकुर्ले,चौहान यांना पुरस्कार प्रदान नांदेड/ प्रतिनिधी नांदेड जिल्हा वृत्तपत्र ...

 

.वृत्तपत्र विक्रेत्यांचा जिल्हा मेळावा उत्साहात. कुळकर्णी, कोकुर्ले,चौहान यांना पुरस्कार प्रदान

नांदेड/ प्रतिनिधी

नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा २७ वा वर्धापन दिन, भारतीय वृत्तपत्र विके्रता दिन आणि भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.१५ ऑक्टोबर रोजी शहरात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. राज्यातील वृत्तपत्र विके्रत्यांसाठीच्या कल्याणकारी मंडळाची घोषणा सरकारने केली आहे परंतु त्याची अंमलबजावणी अजून झाली नाहीये. यासाठी जिल्'ातील सर्व आमदार,खासदार मिळून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागू असे आश्वासन भाजपाचे महानगराध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी दिले आहेत.

गुरुवारी दुपारी शहरातील माता गुजरीजी उद्यान ते महात्मा फुले पुतळा आणि हॉटेल अतिथीपर्यंत शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांची भव्य रॅली काढण्यात आली. सायंकाळी हॉटेल अतिथी सभागृहात जिल्हा मेळावा, कॉ.अनंतराव नागापूरकर पत्रकारिता आणि वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार सोहळा व गुणवंतांचा सत्कार पार पडला. अध्यक्षस्थानी राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार होते तर उद्घाटक म्हणून सेना आ.बालाजी कल्याणकर, आ.अमरनाथ राजूरकर, ॲड.प्रदीप नागापूरकर,संतोष पांडागळे, विजय येवनकर,शंतनु डोईफोडे, रामेश्वर काकडे, कालिदास जहागीरदार, पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, विक्रेते किशनसिंह चौहान, ज्येष्ठ पत्रकार माधवराव काकुर्ले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घाटोळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चंद्रकांत घाटोळ यांनी प्रास्तविकात वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्य, विविध समस्या मांडल्या.आ. अमरनाथ राजूरकर, आ.बालाजी कल्याणकर यांच्याहस्ते कॉ.अनंतराव नागापूरकर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार संजीव कुळकर्णी, ज्ञानगंगा पत्रकारिता सन्मान नायगावचे माधवराव कोकुर्ले, कॉ.अनंतराव नागापूरकर राज्य वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार भोकरचे किशनसिंह चौहान यांना शाल, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम स्वरुपात प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळयांचा कडकडाट केला. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचाही मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यात    अजिंक्य गणेश रत्नपारखे,

आरोही बाबुराव बोरकर, बालाजी सत्यनारायण देवरकोंडा, सुप्रिया भागवत गायकवाड ,शहाबाज खान खय्युम पठाण ,

 मारोती विठ्ठल फडेवार, खुशी बालाजी चंदेल,  यश बालाजी चंदेल,  स्वरुपा सत्यनारायण आंधे,  प्रथमेश रमेश वंगलवार यांचा समावेश आहे.संघटनेच्या कार्यात नेहमीच साथ देणारे पत्रकार कृष्णा उमरीकर, सुभाष लोणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन सृष्टी संदीप कटकमवारहिने केले.

आ.अमर राजूरकर, आ.बालाजी कल्याणकर, पांडागळे,डोईफोडे,नागापूरकर,काकडे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.तसेच सत्काराला उत्तर देताना संजीव कुळकर्णी यांनी, पुरस्कार राशीत स्वत:चे पाच हजार टाकून वृत्तपत्र विक्रेता संघटनेला देणगी जाहीर केली.संघटनेच्या कार्यात नेहमीप्रमाणेच सहकार्य करु अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमास वृत्तपत्र विक्रेते, त्यांचे कुटुंबीय मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार, सहसचिव भागवत गायकवाड, सरदारसिंह चौहान, अनुप ठाकूर, दीपक नरवाडे, दीपक तिडके, बालाजी चंदेल, सत्यनारायण देवरकोंडा, अनंत संगेवार, बालाजी सुताडे यांनी केले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group