**नायगाव (बा.), दि. १५ ऑक्टोबर २०२६ :** भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि युवा पिढीचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नायगाव (बा.) येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना ग्रंथवाटप करून वाचनसंस्कृतीच्या संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्याम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा आणि पुस्तकांना जीवनातील खरे मित्र बनवावे, असे आवाहन केले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी युवकांना ज्ञान, विज्ञान, जिद्द आणि स्वप्नपूर्तीचा दिलेला संदेश आजही प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांची ज्ञानसंपदा वाढावी आणि ग्रंथालयाचा उपयोग अधिक प्रभावीपणे व्हावा, या उद्देशाने ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना ग्रंथांचे वाटप करण्यात आले. डिजिटल युगातही पुस्तकवाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. बी. आर. लोकलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सिद्धेश्वर राऊत यांनी केले.
या कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी प्रो . डॉ . श्रीरंग वटट्मवार आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. सिद्दिकी, नॅक समन्वयक डॉ. एस. एस. अंजनीकर, डॉ. एन. पी. सानप, डॉ. गोविंद परडे, डॉ. संजय भालेराव, प्रा. मनीषा पांगारकर, प्रा. अश्विनी जक्कावाड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते ग्रंथालय सहकारी श्री. महेश मोहिते यांचे सहकार्य लाभले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथालय विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

COMMENTS