नांदेड (प्रतिनिधी)- ज्येष्ठ अभिनेते तथा 'नाम'चे संस्थापक नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याच्...
नांदेड (प्रतिनिधी)- ज्येष्ठ अभिनेते तथा 'नाम'चे संस्थापक नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याच्यावतीने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी एक वाजता दैनिक 'गोदातीर समाचार' कार्यालय, शिवाजीनगर, नांदेड येथे ही श्रद्धांजली सभा होणार आहे.
दिवंगत नाना पाटेकर यांनी 2015 पासून नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी केलेल्या भरीव काम/ मदतीबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही सभा होत आहे. या सभेस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS