उमरी नरेंद्र येरावार
उमरी शहरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित KD The Boss भव्य दांडिया महोत्सव २०२६ आज, शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गोरठेकर कॉम्प्लेक्ससमोर, मोंढा मैदान, उमरी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. जाईताई कैलास देशमुख गोरठेकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. संदीप जाधव प्रस्तुत या कार्यक्रमात झी टॉकीजचे मिमिक्री आर्टिस्ट विविध मनोरंजक कार्यक्रम सादर करणार आहेत. यासोबतच महिलांसाठी खेळ पैठणीचा, विविध मनोरंजक खेळ, लकी ड्रॉ स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसे अशी अनेक खास आकर्षणे असणार आहेत.
दरम्यान, दि. ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत KD The Boss भव्य दांडिया महोत्सवांतर्गत दररोज दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवामुळे उमरी शहरासह परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना मनोरंजनाची संधी मिळावी आणि नारी शक्तीचा सन्मान व्हावा, या उद्देशाने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी उमरी शहर व परिसरातील सर्व माता-भगिनींनी आज सायंकाळी ७ वाजता गोरठेकर कॉम्प्लेक्स समोर, मोंढा मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि विविध स्पर्धा व आकर्षक बक्षिसांचा आनंद घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. जाईताई कैलास देशमुख गोरठेकर यांनी केले आहे.
.....

COMMENTS