मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार यांचे आवाहन
नांदेड प्रतिनिधी :
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुशील घोटे पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार यांनी केले.
नांदेड येथे आयोजित प्रचार कार्यक्रमात ते बोलत होते. पदवीधरांच्या विविध समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या उमेदवाराला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, या निवडणुकीत संघटनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रचार कार्यक्रमाला उमेदवार सुशील घोटे पाटील, मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, स्वा. मुक्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत जोगदंड, प्रा. विशाल बेलुरे, गणेश बडुरे, संभाजी पाटील गुद्दे, मुख्याध्यापक पेटकर, आर. पी. वाघमारे, आनंद मोरे, जयवंत शिंदे, माधव कांजाळकर, एस. डी. कपाटे, जे. डी. रोकमवार, इसादकर, गंगाधर तेलंग, अब्दुल हसिब, झकिरखान यांच्यासह विविध कर्मचारी व पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून संघटनेची भूमिका आणि उमेदवाराची माहिती प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त केला.

COMMENTS