मनोगत.... हेलपाटा कादंबरी आता तीन वर्षांची होत आली होती. तिच्या आता नवव्या आवृत्तीचे वितरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू होते परंतु ति...
हेलपाटा कादंबरी आता तीन वर्षांची होत आली होती. तिच्या आता नवव्या आवृत्तीचे वितरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू होते परंतु तिच्या सहाव्या आवृत्तीचे वितरण सुरू असतानाच ती हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात एम.ए. मराठी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात लागली होती. बाईच्या (आईच्या) हयातीतच तिचा व भाऊंचा संघर्ष विद्यापीठ स्तरावर अभ्यासाला लागला होता. त्यामुळे मी एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती घेत होतो.
हेलपाटा हे माझे तसे सातवे पुस्तक होते. याआधी माझे 'शेताच्या बांधावर, सांजवेळ, स्वप्नचित्र, चांदणं पेरीत जाऊ, होरपळ आणि नांगरतो तळहाताच्या रेषा' हे सहा कवितासंग्रह यापूर्वीच प्रकाशित झाले होते. पण मला खरी लेखक म्हणून ओळख हेलपाट्याने दिली. हेलपाटा प्रकाशित झाल्यापासून मी एकही दिवस हेलपाट्याशिवाय जगलो नाही. म्हणजे तशी मला हेलपाट्याने उसंतच दिली नाही. ते करत असतानाच मी सन २०२४ ला माझी पुढची सामाजिक कादंबरी 'पायपीट' लिहून हातावेगळी केली होती.
२०/८/१९९८ ला मी ग्रामसेवक म्हणून रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात नोकरीला हजर होण्यासाठी गेलो आणि तेव्हाच हेलपाटा कादंबरीचा प्रवास थांबवला होता. हेलपाटा कादंबरी आता हजारो वाचकांनी, समीक्षकांनी वाचली होती, हाताळली होती. त्यामुळे नोकरी लागेपर्यंतचा काळ लोकांनी अनुभवला होता. हेलपाटा वाचून अनेकांनी अश्रू ढाळले होते त्यामुळे त्यांना माझा पुढचा प्रवास जाणून घेण्याची आस लागली होती.
जीवनात अनेक वेळा आपल्याला यश-अपयश मिळते. एखादी नोकरी लागली म्हणजे आपण सेटल होतो पण जीवनात येणारी सुख-दुःखे, अडी-अडचणी ह्या येतच असतात. त्यावर मात करण्याचे 'कसब' आपल्याकडे असले तर आपला निभाव लागू शकतो अन्यथा आपली अवस्था पतंगासारखी होते. जीवन जगत असताना आपण अनेक वेळा चक्रव्यूहात सापडतो. त्याची उकल आपल्याला करता आली नाही तर आपली अवस्था महाभारतातल्या अभिमन्यूसारखी होते. हे जीवनाचे वास्तव सत्य आहे.
ग्रामसेवकाची नोकरी करताना अनेक कसोट्यांवर तुम्हाला काम करावे लागते. अनेकदा तुमच्या बुद्धीचा, तुमच्या क्षमतांचा *कस* लागतो. तुम्ही शंभर कामे चांगली केली आणि एखादे काम तुमच्याकडून खराब किंवा वाईट झाले तरी त्या तुमच्या शंभर चांगल्या कामांना काहीच महत्त्व राहत नाही. ग्रामसेवकाची नोकरी करताना तुम्हाला सर्वच स्तरांवर म्हणजे बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक या सर्व पातळ्यांवर आपले 'कसब' वापरून 'गावगाडा, ऑफिस, कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक' या सर्वांच्याच अपेक्षांचा मेळ घालावा लागतो. ग्रामसेवकाची नोकरी करताना दैनंदिन कामामुळे येणारे जीवघेणे ताण-तणाव जीवन नकोसे करतात त्यामुळे अनेक वेळा अनेक जण व्यसनाच्या अधीन होतात. या दैनंदिन कामाच्या ताण-तणावामुळे अनेक ग्रामसेवक बांधवांनी आपले जीवनही संपवले आहे. पस्तीस वर्षे नोकरी करून नोकरीच्या शेवटच्या दिवशी सस्पेंड झालेले ग्रामसेवकही आपल्याकडे आहेत. ग्रामसेवक जरी गावगाड्यात तळागाळात काम करणारा शासनाचा शेवटचा घटक असला तरी तो एक माणूस आहे ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे.जीवन जगताना ग्रामसेवक म्हणुन नोकरी करताना जो कस लागतो तो कस म्हणजेच कसब म्हणून मी हा 'कसब' कादंबरी लिहिण्याचा घाट घातला आहे. माझ्या जीवनातील हे अनुभव हजारो ग्रामसेवकांच्या जीवनातीलच आहेत हे मी येथे निश्चितपणे नमूद करतो. कसब पुस्तकाचे कव्हर रेखटणारे श्री. सरदार जाधव सर... , कसबसाठी पाठराखन देणारे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक डाॅ . भालचंद्र नेमाडे सर , मुद्रित शोधन कलणारे श्री . अर्जुन वेलजाळी सर , अल्पावधितच सुंदर पुस्तक प्रकाशित करणारे श्री. दिपक चांदणे सर आणि त्यांची प्रतिमा पब्लिकेशन पुणे ची संपुर्ण टिम . माझे सर्व हेलपाटाप्रेमी वाचक आणि माझे नोकरीतले सर्व आधिकारीवर्ग माझे व्यवसायबंधु ग्रामसेवकबांधव आणि माझे सर्व मित्रपरिवार आणि माझे कुटुंबिय या सर्वांचे ऋण व्यक्त करतो .
हेलपाट्याला आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिले, उदंड प्रतिसाद दिला तसाच तुम्ही 'कसब' ला द्याल अशी आशा करतो आणि थांबतो...!

- तानाजी धरणे
- ९९७५३७०९१२
- कादंबरी कसब

COMMENTS