सन १९९० मध्ये स्थानिक पाटबंधारे विभाग, सिरसाळा, जिल्हा बीड येथे गौतम संभाजी कुरे नावाचा एक होतकरू युवक कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्त होतो. त...
सन १९९० मध्ये स्थानिक पाटबंधारे विभाग, सिरसाळा, जिल्हा बीड येथे गौतम संभाजी कुरे नावाचा एक होतकरू युवक कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्त होतो. ते युवक म्हणजे माझे मोठे बंधू आदरणीय श्री. गौतम संभाजी कुरे! आज ते जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर येथून उपअभियंता या पदावरून आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेची यशस्वी सांगता करून सेवानिवृत्त होत आहेत.
वास्तविक पाहता, अभियंता हा एक तंत्रज्ञानाचा जाणकार असतो. आपल्या तांत्रिक ज्ञानाच्या बळावर तो नवनिर्मिती, विकास आणि विविध समस्यांचे निराकरण करतो. त्यातूनच देशाच्या आणि समाजाच्या भौतिक व आर्थिक विकासाचा पाया घातला जातो. जल आणि जमीन या नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाच्या माध्यमातून मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजना समाजाला समृद्धीच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.
अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून पुढे आलेल्या श्री. गौतम कुरे यांनी याच विभागात विविध ठिकाणी आणि अनेक पदांवर कार्यरत राहून सन १९९० ते २०२६ या कालावधीत अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ सेवेला आज ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या प्रवासाला एक गौरवशाली सेवायात्रा म्हटले, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आज त्यांच्या या समर्पित सेवायात्रेची सांगता होत आहे.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात असलेल्या पानगाव या गावचे मूळ रहिवासी असलेल्या श्री. गौतम कुरे यांना बालपणापासूनच शिक्षणाची आणि कठोर परिश्रमाची विशेष आवड होती. याच जिद्दीच्या बळावर त्यांनी सन १९८५ मध्ये रेणापूर केंद्रातून दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला.
काही उपलब्धी या केवळ वैयक्तिक यश नसतात, तर त्या समाजासाठी, गावासाठी आणि कुटुंबासाठी अभिमान, प्रेरणा आणि सन्मानाचा विषय ठरतात. माझे मोठे बंधू हे आमच्या समाजातील आणि गावातील पहिले अभियंता आहेत. त्यांची ही सुमारे ३६ वर्षांची सेवायात्रा कठोर परिश्रम, अनुभव, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण यांची प्रेरणादायी गाथा आहे.
अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येऊन उपअभियंत्यापर्यंतचा संघर्षमय आणि यशस्वी प्रवास पूर्ण करणे, ही बाब शब्दांत मांडणे माझ्यासाठी अत्यंत कठीण आहे. कनिष्ठ अभियंता म्हणून सुरू झालेला हा प्रवास केवळ नोकरीची सुरुवात नव्हती, तर आपल्या ज्ञानाच्या, कौशल्याच्या आणि अथक परिश्रमांच्या बळावर घर, कुटुंब आणि समाजाच्या विकासात योगदान देण्याच्या दृढ संकल्पाची ती सुरुवात होती.
अभियांत्रिकी सेवेसाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान, संयम, निर्णयक्षमता, शिस्त आणि जबाबदारी पार पाडण्याची वृत्ती ही उपअभियंता श्री. गौतम कुरे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये राहिली आहेत. याच गुणांच्या बळावर त्यांनी सिरसाळा, परभणी, चिखली आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी शासकीय सेवेचा अनुभव घेत आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने प्रगती केली आणि उपअभियंता या महत्त्वपूर्ण पदापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. ही त्यांच्या जीवनातील एक मोठी उपलब्धी आहे.
कोणत्याही व्यक्तीची खरी ओळख तिच्या पदावरून किंवा प्रतिष्ठेवरून ठरत नसते, तर तिचे विचार, वर्तन, कार्यशैली आणि सामाजिक व कौटुंबिक उन्नतीसाठी केलेले अथक प्रयत्न यांमधून तिचे व्यक्तिमत्त्व उजळून निघते.
माझे मोठे बंधू आदरणीय गौतम कुरे यांनी जल आणि जमीन या नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनातून ग्रामीण विकासासाठी तसेच शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या कार्यासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे ते एक कुशल आणि यशस्वी अभियंता तर आहेतच; परंतु त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आमच्या घर-परिवाराला एकसंध ठेवणारे ‘घर-परिवाराचे अभियंता’ आहेत.
कारण, ते शिकून-सवरून अभियंता झाले नसते, तर कदाचित आजही मी आणि माझे कुटुंब त्याच आर्थिक विवंचनेत संघर्ष करताना दिसलो असतो. आज आमच्या संपूर्ण कुटुंबात एक प्राध्यापक, तीन अभियंते आणि दोन एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. या प्रगतीचे मोठे श्रेय माझ्या मोठ्या बंधूंनाच जाते.
येथे महाराष्ट्रातील क्रांतिकारी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग मला आठवतो—
‘एका बीजा केला नास । मग भोगिले कणीस ॥’
अगदी याचप्रमाणे, माझ्या कुटुंबाच्या विकासाचे बीज माझे मोठे बंधू गौतम कुरे हेच आहेत. त्यांनी आपल्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वातून आमच्या कुटुंबाच्या प्रगतीचा मजबूत पाया घातला. त्या पायावर उभे राहून आज कुटुंबातील अनेक सदस्य विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
म्हणूनच मी त्यांच्याकडे केवळ एक अभियंता म्हणून पाहत नाही, तर त्यांना आमच्या घर-परिवाराचे अभियंता मानतो. त्यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन, अनुभव आणि स्नेहपूर्ण वागणूक ही आमच्या कुटुंबासाठी अमूल्य संपत्ती आहे. त्यांची शिस्त, जबाबदाऱ्यांप्रती असलेली गंभीरता आणि कितीही संकटे आली, तरी अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करत कार्यक्षम राहण्याची जिद्द आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील.
श्री. गौतम कुरे हे एक कुशल प्रशासक असण्याबरोबरच एक जबाबदार पुत्र, प्रेमळ पती आणि कर्तव्यदक्ष पिता आहेत. प्रत्येक नातेसंबंध प्रेमाने आणि सन्मानाने जपणे, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ते एक उत्तम आणि सहृदय मित्रदेखील आहेत. कारण बालपणापासून, महाविद्यालयीन जीवनापासून ते आजपर्यंतच्या सेवाकाळातील मित्रमंडळींचा त्यांच्याकडे आजही सतत राबता असतो.
एक लहान भाऊ म्हणून माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावुक आणि अभिमानास्पद आहे. कारण आज मी ज्या स्थानावर आहे, त्यामागे माझ्या मोठ्या बंधूंचा सिंहाचा वाटा आहे. माझे शिक्षण, नोकरी, विवाह, साहित्यनिर्मिती आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान या सर्व बाबींमध्ये त्यांच्या प्रोत्साहनाचे अमूल्य योगदान राहिले आहे
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या; परंतु प्रत्येक वेळी त्यांनी त्या समस्यांवर धैर्याने मात केली आणि एका धीरगंभीर, उदात्त चारित्र्याच्या नायकाप्रमाणे त्यातून मार्ग काढला. म्हणूनच त्यांच्या आजवरच्या जीवनप्रवासाकडे मागे वळून पाहताना मनात त्यांच्याविषयी अपार आदर आणि आत्मीयतेची भावना अधिकच दृढ होते.
त्यांचा सेवाकाळ म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी केवळ नोकरीच्या ३६ वर्षांचा हिशेब नाही, तर कुटुंबाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा चढता आलेख आहे. त्यामध्ये परिश्रम, कर्तव्यनिष्ठा आणि सातत्याने पुढे जात राहण्याची प्रेरणादायी कहाणी स्पष्टपणे प्रतिबिंबित होते.
सेवापूर्ती म्हणजे कर्म आणि कर्तव्यापासून पूर्णविराम घेणे नव्हे, तर जीवनाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी होय. शासकीय पदावरून त्यांना निवृत्ती मिळाली असली, तरी बुलंद हौसल्यांच्या बळावर पंख पसरून स्वच्छंद विहार करण्यासाठी अजूनही संपूर्ण आकाश बाकी आहे.
आपल्या आयुष्यातील आगामी काळ निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि कौटुंबिक आनंदाने परिपूर्ण होवो. आपण सदैव हसत-खेळत, आनंदी आणि समाधानी राहावे. भविष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला नवी ऊर्जा, नवे चैतन्य आणि नवनवीन आनंद प्रदान करो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
शेवटी, आपल्यासाठी एवढेच म्हणावेसे वाटते—
“तेरा अख़लाक दे रहा है, पता तेरी बुलंदी का।
तेरा ये झुक के मिलना, कह रहा है आसमाँ है तू॥”

- प्रा. डॉ. रमेश संभाजी कुरे
- आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली.

COMMENTS