तरुणाईला उद्योग व्यवसायाकडे वळवणारी प्रेरणादायी कादंबरी : नवी क्षितिजे

सौ.मीनल वसमतकर यांच्या मते बुद्धिवंत तरुणांनी बाहेरच्या देशात न जाता भारतातच बुद्धीचा वापर करून आपल्या देशाची प्रगती करावी ही त्यांची विचा...



सौ.मीनल वसमतकर यांच्या मते बुद्धिवंत तरुणांनी बाहेरच्या देशात न जाता भारतातच बुद्धीचा वापर करून आपल्या देशाची प्रगती करावी ही त्यांची विचारधारा आहे. त्याच दृष्टीने त्या समाजाकडे पाहतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीस अमेरिकेत स्थायिक झालेले कुटुंब दिसले. जे कोरोनामध्ये अमेरिकेने देश सोडायला सांगितल्यानंतर भारतात आले आणि त्यातील तरुण मुलाने नोकरी न करता उद्योग उभा करायचे स्वप्न पाहिले. या स्वप्नामागे आपल्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार देणे, आपल्या भागाची प्रगती करणे, भारतातील तरुणाईला उद्योग व्यवसायाचे वेड लावणे, नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणाऱ्या हातांना बळ देणे हेच होते.हे स्वप्न वसमतकर भारतातील तरुणाईच्या मनामध्ये रुजवतात. म्हणूनच त्या मनोगतातून भारतीय तरुणांना म्हणतात, " भारतीय तरुणांनी- तरुणींनी परदेशात जाऊन जरूर शिकावे पण त्या ज्ञानाचा उपयोग भारत भूमीसाठी करावा. कारण हा देश तरुण-तरुणींचा आहे. वीर जवानांचा आहे. कृषीप्रधान आहे, बुद्धिमान लोकांचा आहे. त्या विचारधारेतूनच आकारास आलेली कादंबरी म्हणजे 'नवी क्षितिजे 'होय.
सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक असे विविध पैलू घेऊन कादंबरी लेखन होताना दिसते. ज्यातून विविध संदर्भ घेऊन पात्र, घटनाप्रसंग, कथानक, भाषाशैलीच्या माध्यमातून कादंबरी आकाराला येते. कादंबरीकार त्यात आत्मा ओतत असतो. आपली कादंबरी समाजोपयोगी, उद्बोधक,परिवर्तनशील कशी बनेल याचा प्रयत्न करतो. असाच प्रयत्न वसमतकर यांनी केला. त्यांनी या कादंबरीतून देशप्रेम रुजवले. एवढेच नव्हे तर तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बणावे हा संदेश दिला. प्रत्येक संकटाला संयमाने तोंड द्यावे यासाठी कोरोना महामारीचा दाखला दिला. त्यात अनेक कुटुंब उध्वस्त झाली. ज्यांनी धिराने, संयमाने आणि आत्मविश्वासाने तोंड दिले तेच तगले. या कादंबरीमध्ये कोरोना महामारी, त्यात अमेरिकेतील स्थिर कुटुंबाला अमेरिका सोडावी लागणे, भारतात नोकरीचा शोध, नंतर उद्योगाकडे वळणे. अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे. एवढेच काय तरी एकत्रित कुटुंब, आजी आजोबा, पणजी पणजोबांचे प्रेम असे विविध भावनिक पैलू उलगडून दाखवले. नात्याची वीण घट्ट विणली.
दिवाकर मुजुमदार यांची राजेश्वरला शेती. पण नोकरीनिमित्त बाहेर राहणे. त्यांच्या भावाने बहिणीला, भावाला शेत न देणे. यातून नात्यात पडलेली दरी. इथून सुरू झालेला कादंबरीचा प्रवास पुन्हा या सर्वांना एकत्रित आणतो. हे कोरोनामुळे घडले. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला त्या काळात हाक दिली ती कोरोना काळात खरी ठरली. शहरातली सर्व माणसे खेड्याकडे येत होती. क्वारंटाईन, सामाजिक अंतर,मास्क, व्हेंटिलेटर असे शब्द कानावर पडत होते. दहशत पसरली होती. नव्हे तर मीडियामुळे ती जास्त पसरली होती. यातच अमेरिकेत स्थायिक झालेले आदित्य मुग्धा, त्यांचा मुलगा सौरभ सून आभा, नातू जाई व रुद्र भारतात आले. एकट्या राहणाऱ्या दिवाकर म्हणजे आदित्यचे वडील यांच्याकडे आले. 14 दिवस क्वारंटाईन तेव्हा मुले बॉल खेळताना तो बॉल वरून खाली पडला. दोघे मुले बॉल द्या म्हणाले. बॉल दिल्यानंतर 'स्वारी पणजोबा' म्हणाले. येथे कुटुंबातील प्रेम आपुलकी एकत्रितपणा काय असतो तसेच कुटुंबातील प्रत्येकाला पैशापेक्षाही एकमेकांच्या आधाराची गरज असते हे सत्य वसमतकर यांनी दाखवले. पैसा हा काही प्रमाणात महत्त्वाचा आहे परंतु माणसाला एकमेकांच्या आधाराची गरज आहे हे सत्य लोकांसमोर ठेवले.
शेती करावी म्हणून सौरभ आजोबाला शेती विषयी विचारतो. तेव्हा ते म्हणतात,"पण अरे तुला नोकरी मिळेल. आदित्य तुम्हाला घेऊन तिकडे गेला आणि मला आता जीवनात काही स्वारस्य उरलं नाही. मी तो शेतीचा नादच सोडला. तूही सोड." 'आजोबा माझ्या मनात असं आहे मी त्या गोदावरीच्या पाण्यातून वीज निर्मितीसाठी त्या जमिनीवर एक मोठा प्रोजेक्ट उरणार आहे.' इथून उद्योगाची सुरुवात होते. त्यानंतर जमिनीचा वाद, गाव, गावातील लोक, पणजोबांचे गावासाठीचे योगदान असे एक एक किस्से उलगडत जातात. भावाकडून शेती भेटणार नाही हा दिवाकरला विश्वास होता. त्याचे चटके त्यांना बसले होते. म्हणून ते नाताला नाद सोडायचा सल्ला देतात. पण सौरभने ते शेत अनेक प्रयत्न करून परत मिळवले. आणि तिथे उद्योग उभारायला सुरुवात केली. वसमतकरनी यातून दुरावलेले कुटूंब प्रयत्नाच्या बळावर एकत्रित येऊ शकते. कोणीतरी माघार घेतली पाहिजे हा सल्ला दिला. जेव्हा तात्या तयार होतात तेव्हा गावातील लोक विरोध करतात. हे प्रत्येक ठिकाणीच घडतं. पण या कादंबरीच्या माध्यमातून वसमतकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन रुजवला. जेव्हा तात्याकडे हे लोक येतात तेव्हा ते म्हणतात,'हेच आपल्या गोदामाईच्या पाण्यावर वीज निर्मितीचे यंत्र बसणार' ' आणि जर हे यंत्र बसले तर शेती खराब होईल. जमीन नापीक होईल असे अनेक प्रश्नांचे उत्तरे शंकाचे निरसन बैठक घेऊन केले जाते. आणि उद्योगामुळे काय होईल हे सांगताना म्हणतात,' आज जो तरुण वर्ग आहे भारतात नोकरी मिळत नाही म्हणून परदेशात जातो.तेच तरुण आपल्या गावात, आपल्या माणसात राहून आपल्या कुटुंबाची सेवा करून नोकरी करतील आणि झालेही तसेच. उद्योग उभा करत असताना पासूनच 3000 पेक्षा जास्त लोकांच्या हाताला रोजगार मिळाला.
हजारो लोकांच्या हाताला काम मिळालं. यामुळे भारतातील अनेक मुले परदेशात जाण्यापासून थांबली. बघता बघता राजेश्वरच्या भूमीत शाळा, दवाखाना सभागृह, वसतिगृह, पॅलेस मोठ्या शहराला जोडणारे रस्ते,रेल्वे लाईन उभे राहिले. हा कायापालट वसमतकर यांनी एका तरुणाचा स्वप्नातून करून दाखवला .कादंबरीकार तरुणांच्या मनामध्ये उद्योगी बनवण्यात यशस्वी ठरल्या. हीच कादंबरीची यशस्वीता म्हणावी लागेल. नवीन पिढीला नवीन क्षितीज निर्माण करावयाचे असेल तर स्वतःचे व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून काम करावे लागते.म्हणून राजेश्वराच्या भूमीमध्ये नवीन क्षितिजे उभी राहिली. असा या कादंबरीचा शेवट म्हणजे लेखिकेने रुजवलेला सामाजिक व्यापक दृष्टिकोन होय. जर आपला, आपल्या परिसराचा, आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर आपण जातीपातीत न अडकता, भांडण तंटे न करता सरळ मार्गी चालत राहिलो तर आपल्याला विकासापासून कोणीच अडवू शकणार नाही हा सकारात्मक विचार वसमतकर यांनी मनामनात पेरला. आणि भारतातील तरुणांनी विदेशात न जाता भारतातच उद्योग उभे करावेत, आपल्या कुटुंबासोबत राहावे, त्यामुळे वृद्धाश्रम बंद पडतील.आजी आजोबा सोबत नातरुंड खेळतील. एकमेकाची काळजी घेणारे माणसे घरातच राहतील. हे संस्कार रुजवणारी कादंबरी प्रत्येकाने संग्रहित ठेवावी अशी आहे. १ नोव्हेंबर प्रकाशनाच्या निमित्ताने कादंबरीकारास हार्दिक शुभेच्छा !
साहित्यिक डॉ.नरसिंग कदम सदस्य, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य,मुंबई तथा प्रोफेसर छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय,उदगीर जि. लातूर.९४०४७३१०१०

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group